Mantra Remedies: एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस सकाळी केलेल्या कामावर अवलंबून असतो. ( Good Morning) सकाळची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली तर व्यक्तीचा दिवस चांगला जातो. (Good Day) त्यासाठी सकाळी काही उपाय केले तर एकदम बेस्ट. जर सकाळी लवकर देवाच्या नामाने किंवा मंत्रांनी दिवसाची सुरुवात केली तर संपूर्ण दिवस व्यक्तीचा चांगला जातो. एवढेच नाही तर व्यक्तीवर येणारे वाईट संकट टळतात. तसेच दिवसभरात अनेक चांगल्या बातम्या मिळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रात मंत्र ध्यान देखील विशेष मानले जाते. (Spirituality News) असे मानले जाते की मंत्र जप केल्याने व्यक्तीला जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. पौराणिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे की, मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. अशा वेळी दिवसाची सुरुवात चांगल्या कामाने केली तर त्याचे फळही चांगलेच मिळते. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करुन देवाचे नामस्मरण करावे, अशी श्रद्धा आहे. तसेच या मंत्राच्या जपाने तुमची सर्व कामे होतात. जाणून घ्या सकाळी उठल्यानंतर कोणत्या मंत्राचा जप केल्याने फायदा होतो. 


या मंत्राचा जप करा


आपला दिवस एकदम फ्रेश जावा असे वाटत असेल तर मंत्राचा जप करा. ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या हाताच्या तळव्याकडे पाहून या मंत्राचा जप करावा. यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारी सर्व दुःखे दूर होतात. जीवनात येणाऱ्या छोट्या-छोट्या समस्यांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर या मंत्राचा जप करुन दिवसाची चांगली सुरुवात करा.


सकाळी उठल्याबरोबर हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत या मंत्राचा जप करावा. तुम्ही जास्त वेळा हा जप केला तरी चालू शकतो. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मन प्रसन्न राहिल.


कराग्रे वसति लक्ष्मीः, कर मध्ये सरस्वती।


करमूले तू ब्रह्मा, प्रभाते कर दर्शनम्।।'


मंत्राचा अर्थ जाणून घ्या 


या मंत्रामध्ये तळहातांच्या पुढील भागात माता लक्ष्मी, मध्यभागी माता सरस्वती आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असल्याचे सांगितले आहे. सकाळी डोळे उघडताच मी तिला पाहतो.


या मंत्राचा जप केल्यानंतर चेहऱ्यावरील हाताचे तळवे व्यवस्थित फिरवा. यामुळे तुमच्यामध्ये दिवसभर ऊर्जा राहील आणि तुम्हाला आतून सकारात्मक ऊर्जा मिळेल.  तुमचा उत्साह चांगला राहण्यास मदत होईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)