Banganga Maha Aarti : त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. वाराणसीमधील गंगा घाटावर दिव्यांची आरास आणि महाआरतीचा भव्य सोहळा रंगतो. जर तुम्हाला वारासणीला जाणं शक्य नसेल तर मुंबईतील वाळकेश्वरमधील बाणगंगा तलाव वारासणीतील नयनरम्य सोहळ्याचा अनुभव याची याची देही याची डोळा अनुभवता येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन अशा दक्षिण मुंबईतील मलबार टेकडीच्या पश्चिम किनारपट्टी वर स्वयं प्रभू श्रीराम ह्यांनी स्वहस्ते स्थापित श्री वाळूकेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे. त्याचं मंदिराच्या समोर एक विस्तीर्ण गोड्या पाण्याचे कुंड आहे जिथे सतत निरंतर तिन्ही त्रिकाळ गोमुखातून शुद्ध निर्मळ जलस्रोत वाहत असतो, त्या प्रचंड डोहाला पवित्र 'बाण गंगा' हे प्रसिद्ध ठिकाण आहे. (Mumbai On the occasion of Dev Deepawali Varanasi Ganga Ghat there is a wonderful ceremony of Deepdan banganga mahaarti)


याठिकाणी कार्तिक पौर्णिमेला म्हणजे देव दिवाळी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी बाणगंगा महाआरतीचा नयनरम्या सोहळा रंगतो. या सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थितीत असतात. प्रत्येकाने एकदा सोहळा नक्की अनुभवावा असा असतो. जी एस बी टेंम्पल ट्रस्ट ही मुंबईतील 140 वर्ष जुनी संस्था असून ती या महाआरतीचं आयोजन करते. 


या महाआरतीसाठी हजारो दिव्यांची आरास करण्यात येते आणि विशेष म्हणजे वाराणसीच्या धर्तीवर महाआरती आणि गंगा पूजन केली जाते. या नयनरम्य आणि अद्भूत भक्तिपूर्ण वातावरणाचं साक्षीदार बनण्यासाठी मुंबईकरानी आवर्जून उपस्थित असतात. 



लंकेला जाताना श्रीराम मुंबईच्या वाळकेश्वर परिसरातून जात असताना येथील पर्वत घनदाट जंगलांनी व्यापले होते. या घनदाट जंगलात आणि समुद्राच्या किनाऱ्यावरील पर्वतांमध्ये परमेश्वराचे चरण सापडले. त्यावेळी त्यांचा एक नियम होता. ते दररोज लक्ष्मणाला काशीहून शिवलिंग आणण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी पाठवत असत. एके दिवशी लक्ष्मणाला काशीहून शिवलिंग आणायला उशीर झाला. अशा स्थितीत श्रीरामांनी येथे वाळूपासून शिवलिंग बनवून त्याची पूजा केली. त्यामुळेच या ठिकाणाला बाळुकेश्वर असे नाव पडले आणि आज ते वाळकेश्वर म्हणून ओळखले जाते.


वाळुकेश्वरमध्ये शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर श्रीरामांना तहान लागली. अशा स्थितीत त्याने बाण सोडला आणि पृथ्वीच्या आतून पाण्याचा स्रोत निघाला. अशा प्रकारे येथे बाणगंगा तलाव तयार झाला. हा तलाव बनतीर्थ किंवा पाताळगंगा या नावानेही ओळखला जातो. श्रीरामांनी अधोलोकाच्या दिशेने बाण सोडला होता, म्हणून त्याला पाताळगंगा असे नाव पडले.


यंदा या सोहळ्याला उज्जैन पिठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर, जगद्गुरू राजदेशीकेन्द्र सिद्धलिंग, शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी, उज्जयिनि सद्धर्मपीठ कर्नाटक आणि उज्जैन पीठ मध्यप्रदेश उपस्थितीत राहणार आहे.  या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दिपक केसरकर, मंत्री शंभूराज देसाई हे निमंत्रित असून अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.