मुंबई : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. काळानुसार रक्षाबंधनची व्याख्या बदलत असली तरी भावना मात्र एकच आहे. आता बहिन फक्त भावाला राखी बांधत नाही तर, भाऊ नसल्यास दोन बहिनी एकमेकांना राखी बांधतात. रक्षाबंधनच्या दिवशी बहिन भावाला ओवाळून राखी बंधते, तर भाऊ आयुष्यभर बहिनीचं संरक्षण करण्याचं वचन देतो. ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. पण पूजेच्या ताटात कोणत्या गोष्टी आवश्यक आहे आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षता - हिंदू धर्मात पूजेच्या थाळीतही अक्षताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. कोणत्याही शुभ कार्यात अक्षतांचा नक्कीच समावेश होतो. त्यामुळे राखी ताटात अक्षतांचा समावेश करा. अक्षता हे पूर्णतेचे प्रतीक आहे आणि त्याचा वापर केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे टिळक करताना अक्षता लावाव्यात. अक्षत लावल्याने भावाचे आयुष्य दीर्घायुषी होते आणि तो समृद्ध राहतो असे म्हणतात.


दिवा लावून आरती करा- राखीच्या ताटात दिवा लावल्यानंतर आरती करावी. दिव्यात अग्नीची देवता वास करते, जी कोणत्याही धार्मिक कार्यात शुभ असते. दिवा लावल्याने नकारात्मकता संपते. त्यामुळे राखी बांधल्यानंतर भावाची आरती करावी. असे केल्याने भावावरील नकारात्मक प्रभाव संपतो.


कुंकु - रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी थाळी सजवताना त्यामध्ये कुंकुचा समावेश करावा. कुंकु हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुमच्या ताटात कुंकुचा समावेश नक्की करा. भावाला टिळक लावल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो. तसेच पैशाची कमतरता नाही.


चंदन - ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भावाच्या डोक्यावर चंदन लावल्याने भावाचे मन शांत राहते. कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने भावाला भगवान विष्णू आणि गणेशाची कृपा प्राप्त होते. चंदन लावल्याने मन शांत राहते. 


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )