Nag Panchami 2023 : नागपंचमीला 4 शुभ योग! `या` राशींना धनलाभासोबत सर्व कामात मिळेल नशिबाची साथ
Nag Panchami 2023 : यंदाच्या नागपंचमीला 4 शुभ योग जुळून येणार आहे. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीचा दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Nag Panchami 2023 : ऑगस्ट महिन्यात अनेक सण आणि उत्सव आहेत. त्यात एक आहे नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंमचीला विशेष महत्त्व असून श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरा केला जातो. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला असणार आहे.
नागपंचमीला शुभ योग!
यंदाची नागपंचमी अतिशय शुभ आहे. या दिवशी 4 शुभ योग जुळून आले आहेत. यंदा या दिवशी मुद्रा योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहे.
याशिवाय श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे अशात हा दिवस काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे.
धनु (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवश खूप शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायिकांना नफा मिळणार आहे. वैवाहित जीवनात आनंद असेल.
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा बसरणार आहे. सुख-समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी नागपंचमी अतिशय शुभ असणार आहे. जोडीदाराशी संबंध मधुर होतील.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना नागपंचमीपासून नशीब साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता दाट शक्यता आहे.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांच्या जीवनात नागपंचमीपासून समृद्धीत वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभणार आहे. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ झाल्यामुळे मनं प्रसन्न राहणार आहे.
नागपंचमी शुभ मुहूर्त (Nag Panchami Subh Muhurt)
पंचमी तिथी सकाळी 5.53 से 8.29 पर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. नागदेवता आणि शंकर भगवानची पूजा आणि अभिषेक करा. त्यानंतर दूध आणि मखाना यांचा नवैद्य अर्पण करा. या दिवशी शिवलिंग आणि नागदेवतेला दुध अर्पण करा.
नागपंचमीचं महत्त्व
मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने माणसाला सापांचं भय राहत नाही, असं म्हणतात. तसंच ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनीही या दिवशी पूजा केल्याने त्यांना फायदा होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. इतर मान्यतेनुसार सापाला आंघोळ करून दूध पाजल्याने दैवी कृपा प्राप्त होते, असं म्हणतात. तर काही भागात घराच्या दारात सापाचं चित्र लावण्याचीही परंपरा आजही पाळली जाते.