Nails Astrology : अशुभ असतात `अशी` नखं; कायमच भासते पैशांची चणचण
नखांचे सर्वच प्रकार लाभदायक असतात असं नाही
Nails Astrology : हस्तरेषा आणि समुद्र शास्त्रामध्ये (Samudra shastra) नखांच्या आधारे भविष्याविषयीची भाकितं करण्यात आली आहेत. इतकंच काय, तर नखं आरोग्याबाबतही बरीच गुपितं उघड करतात हेसुद्धा आता सिद्ध झालं आहे. नखं फक्त सौंदर्याच भर टाकणाराच घटक नाही, तर हा तुमचं आयुष्य घडवणाराही एक महत्त्वाचा घटक आहे.
नखांचे सर्वच प्रकार लाभदायक असतात असं नाही, तर काही प्रकारची नखं ही अशुभसूचक असतात.
कोणत्या प्रकारची नखं अशुभसूचक असतात?
- समुद्र शास्त्रामध्ये पिवळी नखं अशुभ मानली जातात. पुराणकथांमध्येही अशी नखं गरीबीच्या दिवसांकडे खुणावत असतात.
- ज्यांची नखं पिवळी, वाकडी-तिकडी आणि तीक्ष्ण असतात, नखांवर डाग असतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा अभाव असतो. इतरांची सेवा करण्यातच त्यांचं आयुष्य व्यतीत होतं.
- नखांवर काळे- पिवळे डाग असल्यास अशा व्यक्तींचं आरोग्य वारंवार बिघडत असतं. अशा व्यक्तींना प्रचंड मेहनत करावी लागते.
- नखांवर बारीक रेषा असणं हाडं कमकुवत असण्याकडे लक्ष वेधतं. अशा व्यक्तींना अर्थराइटिस, डायबिटीज, एक्झिमासारखे आजार ग्रासू शकतात.
- ज्यांची नखं वाकडी,रुक्ष आहेत अशा व्यक्तींना फार अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )