Name Astrology : जोडीदाराचं नाव `या` अक्षरापासून सुरु होतंय? समजा तुमचीच निवड बेस्ट
खालीलपैकी कोणत्याही आद्याक्षरावरून तुमच्या जोडीदाराचं नाव सुरु होत असेल तर समजा, तुमची निवड बेस्ट
मुंबई : नाम ज्योतिषाच्या विद्येमध्ये व्यक्तीच्या नावात असणारं आद्याक्षर त्यांच्या स्वभावांतील गुणविशेष आणि दोषांकडे लगेचच लक्ष वेधतात. नावातील पहिलं अक्षर त्या व्यक्तीचं भविष्य कसं असतं याची माहिती देतं. शिवाय ते जोडीदार म्हणून कसे असतील हेसुद्धा अधिक स्पष्ट करुन सांगतात. तुमच्या जोडीदाराच्या नावाचं आद्याक्षर काय आहे? जर खालीलपैकी कोणत्याही आद्याक्षरावरून तुमच्या जोडीदाराचं नाव सुरु होत असेल तर समजा, तुमची निवड बेस्ट! (Name Astrology )
A नं सुरु होणारी नावं..
ज्या मुलाचं नाव A सुरु होतं तो पत्नीवर निस्सिम प्रेम करतो. प्रत्येक बाबतीत तिची काळजी घेतो. पत्नीच्या आनंदासाठी तो कोणत्याही थराला जातो.
K नं सुरु होणारी नावं..
K पासून सुरु होणारी नावं असणारी मुलं, अतिशय प्रामाणिक असतात. प्रत्येक परिस्थितीमध्ये ते जोडीदाराची साथ देतात. संपूर्ण जगाशी जोडीदाराच्या हितासाठी हुज्जतही घालतात.
P नं सुरु होणारी नावं..
ज्या मुलांची नावं P पासून सुरु होतात, ती मुलं पत्नीवर फक्त प्रेमच करत नाहीत तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिकून रहावा यासाठी बरेच प्रयत्न करतात. या मुलांची विनोदबुद्धी कमाल असते.
R नं सुरु होणारी नावं..
R नं ज्या मुलांच्या नावांची सुरुवात होते त्यांचा राग जरा जास्त असतो. पण, जोडीदाराप्रती ही मुलं कायम प्रामाणिक असतात. लहानसहान गोष्टींमधला आनंद शोधण्यात ही मुलं हुशार असतात.
V नं सुरु होणारी नावं..
ज्या मुलांची नावं V पासून सुरु होतात ती मुलं जोडीदाराला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. यातून त्यांचं प्रेम सिद्ध होतं. ही मुलं प्रचंड रोमँटिक असतात.