मुंबई: ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्रालाही तितकंच महत्त्व आहे. जन्म तारखेवरून मूलांक आणि भाग्यांक काढले जातात. 1 ते 9 अंकांवर ग्रहांचा प्रभाव पाहायला मिळतो. कोणत्याही व्यक्तीची जन्म तारीख ही मूल्यांक असते. भाग्यांकासाठी जन्म तारखेची बेरीज केली जाते. 6-6-2022 ही जन्मतारीख असेल तर भाग्यांक हा 9 असतो. 6+6+2+0+2+2= 18, 1+8= 9 अशी बेरीज करून भाग्यांक काढला जातो. तर मूलांकासाठी जन्म तारीख ग्राह्य धरली जाते. कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक हा 4 असतो. अंकशास्त्राच्या आधावर व्यक्तीचा स्वभाव ओळखणं सोपं होतं. 1 ते 9 पर्यंत मूलांकात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक भिन्न असते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा शांत आणि बोलकेपणा यात फरक आढळतो. 4 या मूलांकावर जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 या अंकाचा स्वामी ग्रह राहु आहे. राहु या ग्रहाचा संबंध भगवान सूर्याशी असतो. त्यामुळे या तारखेंवर जन्मलेल्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असते. मूलांक 4 च्या लोकांचे भविष्य खूप उज्ज्वल असते. करिअरमध्ये खूप पुढे जाताना त्यांना नशिबाची साथ मिळते. हे लोक इतरांकडून काम करून घेण्यात पटाईत असतात.


मूलांक 4 असलेल्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असते. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते. त्याचबरोबर सूर्याच्या प्रभावामुळे कीर्ती आणि सन्मानही मिळतो. या लोकांना पैशाची कमतरता नसते. त्यामुळे असे लोक स्वभावाने अहंकारी असतात. इतर लोकांचा हा स्वभाव त्यांना अजिबात आवडत नाही. शक्यतो इतरांना भेटणे, बोलणे किंवा कामात मदत करणे यांना आवडत नाही. त्यांना स्वबळावर जगायला आवडते. तसेच स्वार्थी असल्याने काम पूर्ण होईपर्यंत इतरांशी संबंध ठेवतात.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )