Navpancham Yog: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे एका खास राजयोग तयार होतात. यामध्ये देवतांचा गुरू बृहस्पति ठराविक काळानंतर राशी बदलतो. 1 मे रोजी गुरूने शुक्र, वृषभ राशीत प्रवेश केला आहे. काही राशीच्या लोकांना बृहस्पति शुक्राच्या राशीत गेल्याने फायदा होतो, तर काहींनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय ज्योतिष्य शास्त्रानुसार, केतू ग्रह कन्या राशीत आहे. अशा स्थितीत दोन ग्रहांमध्ये नवपंचम योग तयार होत आहे. सिंह राशीमध्ये नवपंचम योग तयार होणार असून हा शुभ योग आहे. या राशींच्या व्यक्तींमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया नवपंचम योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.


वृषभ रास (Vrishbha Zodiac)


वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग देखील खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. नोकरदार लोकांचे समर्पण आणि मेहनत लक्षात घेऊन काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. लव्ह लाईफच्या बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे.


सिंह रास (Leo Zodiac)


या राशीच्या दहाव्या घरात नवपंचम योग तयार होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअर आणि बिझनेसमध्ये काही बदल दिसू शकतात. नेतृत्व क्षमता वाढू शकणार आहे. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकते. घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांनाही लाभ मिळू शकतो. जर तुम्ही परदेशी व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते.


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग खूप फायदेशीर ठरू शकतो. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकणार आहे. तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला अफाट यशासोबत आर्थिक लाभही मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या कामात काही बदल करायला आवडेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)