मुंबई : नवरात्रीला 10 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावेळी देवी जहाजावर बसून येणार आहे. तर हत्तीवरुन प्रस्थान होणार आहे. हे दोन्ही ही दिवस खूपच शुभ आहेत. पण याच्या शिवाय अजून काही चांगले योग येत आहेत.


नवरात्रीतला शुभ योग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 दिवसाच्या नवरात्रीमध्ये 2 गुरुवार येत आहे. हा अत्यंत शुभ योग आहे. कारण गुरुवार सर्व दिवसांमध्ये सगळ्यात उत्तम दिवस मानला जातो. स्वगृही शुक्राचा देखील शुभ योग आहे. या विशेष योगमुळे नवरात्री अत्यंत शुभ मानली जात आहे.


खरेदी करणं शुभ ठरेल


यावर्षी नवरात्रीमध्ये 9 दिवस राजयोग, द्विपुष्कर योग, सिद्धियोग, सर्वार्थसिद्धी योग, सिद्धीयोग आणि अमृत योग येत आहेत. या विशेष योगमध्ये खरेदी करणं शुभ ठरतं. या योगमध्ये पूजा, साधना आणि आराधना करणं देखील फलदायक ठरु शकतं.


महाष्टमी - बुधवार, 17 ऑक्टोबर


महानवमी - गुरुवार, 18 ऑक्टोबर


विजयादशमी - शुक्रवार, 19 ऑक्टोबर


कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त


अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात प्रतिपदा ते शारदीय नवरात्रीचा शुभारंभ होतो. प्रतिपदेला 9 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी आरंभ होत असून 10 ऑक्टोबरला 7 वाजून कर 25 मिनिटांनी समाप्त होत आहे. 10 ऑक्टोबरला कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी ते 7 वाजून 25 मिनिटांपर्यंत कलश स्थापना करु शकता.