Navpancham Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका काळानंतर राशी बदलतो. ज्यावेळी एखादा ग्रह त्याची राशी बदलतो तेव्हा ग्रहांची युती होऊन राजयोग तयार होतो. दरम्यान याचा व्यक्तीच्या जीवनावरंही प्रभाव पडताना दिसतो. लवकरच अजून एका राजयोग तयार होणार आहे. शनि आणि शुक्राच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि शुक्र यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. या दोघांच्या युतीचा प्रभाव राशीच्या लोकांवर होणार आहे. दरम्यान यामध्ये चार राशी अशा आहेत, ज्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. पाहूयात कोणाला राजयोगाचा लाभ होणार आहे.


या राशींच्या व्यक्तींना होणार राजयोगाचा फायदा


मेष रास


या राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवपंचम राजयोग खूप अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. या काळात ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात असणार आहेत, त्यांना नोकरी मिळू शकणार आहे. या परिस्थितीत तुम्हाला प्रतिष्ठेचा लाभ मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे. कुटुंबामध्ये भाऊ आणि बहीणींचं प्रेम मिळू शकणार आहे.


वृषभ रास


नवपंचम राजयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना देखील मिळणार आहे. शुक्राचं होणार परिवर्तन तुम्हाला आर्थिक स्थितीसाठी फायदेशीर ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित पणे एखाद्या अज्ञात स्त्रोताकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. नवीन नोकरीच्या ऑफर येण्याची दाट शक्यता आहे.


मिथुन रास


मिथुन राशीच्या लोकांनाही या राजयोगाचे चांगले फायदे मिळू शकतात. नवपंचम राजयोग या लोकांना अनुकूल ठरणार आहे. तुमच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. मुख्य म्हणजे या काळात नशीब तुमच्या सोबत असणार आहे. परदेशात जाण्याची तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते. नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.


सिंह रास


सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. या काळामध्ये  उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकणार आहे. जोडीदाराच्या प्रगतीसोबतच मान-प्रतिष्ठेतही वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक वाढ दिसून येईल. कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होऊ शकणार आहेत. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )