Navratri 2022 : नवरात्रीत ओढवून घ्याल गरीबी..देवीला चुकूनही अर्पण नका करू या गोष्टी..
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसापासून पुढचे 9 दिवस सर्वजण देवीच्या विविध रुपांची आराधना करणार आहेत. अशा या मंगलपर्वात दर दिवशी देवीच्या एक-एका रुपाची पूजा बांधली जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या
Shardiya Navratri 2022: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसापासून पुढचे 9 दिवस सर्वजण देवीच्या विविध रुपांची आराधना करणार आहेत. अशा या मंगलपर्वात दर दिवशी देवीच्या एक-एका रुपाची पूजा बांधली जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या
दिवशी देवीचं आगमन गज म्हणजेच हत्तीवरून होत आहे, थोडक्यात देवीचं वाहन हत्ती आहे. अगणित आशीर्वाद आणि प्रचंड सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असणाऱ्या या मंगलमय दिवसांदरम्यान, आपण अनेक अशा गोष्टी ज्यामुळं देवी प्रसन्न होईल. पण, यादरम्यान नेमकं काय करू नये हे
जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं. ( Avoid these things and mistakes during navratri )नवरात्र काळात देवीची पूजा करताना काही गोष्टी कारण टाळलं पाहिजे शिवाय, काही गोष्टी ,देवीची आरती करताना कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. चला जाणून घेऊया.
आणखी वाचा: Navratri 2022: नवरात्रीत दारात स्वस्तिक काढल्यामुळे दूर होणार वास्तूदोष; पाहा कसं करेल काम
नारळ
हिंदू धर्मात नारळाला पूजेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. घरात कुठलही शुभ कार्य असेल तर नारळ अग्रणी असतोच . पण तुम्हाला माहित आहे नवरात्रींनमध्ये नारळ वापरताना अत्यन्त लक्ष दिल पाहिजे नारळ हे तीन प्रकारचे असतात ओला नारळ जो हिरव्या रंगाचा असतो ,सुका
नारळ ज्याचं खोबर बनवलं जात जेवणात वापरतात आणि एक असतो पूजेचा नारळ . तर देवीची पूजा करताना पाणी असलेला आणि भरपूर जटा असलेला नारळ घ्यावा. तो अत्यन्त शुभ समजला जातो सुका नारळ पूजेसाठी कधीच वापरू नये.
चिरा गेलेला किंवा तडा गेलेला नारळ पूजेसाठी कधीच वापरू नये. स्त्रियांनी नारळ कधीच फोडू नये कारण स्त्री बीजधारण करणारी असते बीज तोडण्याचं काम करू नये असं म्हटलं जात. म्हणून नवरात्रींमध्ये देवीच्या समोर स्त्रियांनी नारळ कधीच फोडू नये असं म्हणतात.
आणखी वाचा: Navratri 2022: नवरात्रोत्सवात मिळतोय देवीचा आशीर्वाद; कौटुंबिक आणि आर्थिक संकटापासून दूर राहण्यासाठी करा 'हे' उपाय
जर तुम्ही खूप कर्जबाजारी झाला असाल तर नारळाला चमेलीच्या तेलात शेंदूर मिक्स करून त्याने नारळावर स्वतिक चिन्ह काढावं देवीला हा नारळ अर्पित करावा आणि नवरात्रींमध्येच शनिवारी किंवा मंगळवारी हा नारळ हनुमान मंदिरात नेऊन हनुमानाला अर्पण करावा अशाने तुमच्यावरील कर्ज उतरू लागेल.
धनासंबंधी समस्या असेल तर
एका नारळावर कुंकवाने स्वस्तिक काढावं नवरात्रीत देवीसमोर हा नारळ ठेवावा. नवरात्री संपल्यावर हा नारळ तिजोरीत ठेवावा याने धन संबंधात कोणतीही समस्या असेल तर निघून जाईल .
देवीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर करू नये. शिवाय दुर्वा आणि रुईची फुले देखील पूजनात वापरू नये. देवीच्या पूजनात खराब झालेली सुकलेली फुल वापरू नये.
तुटतेले खराब झालेले दिवे वापरू नये.
त्यामुळे देवीच्या पूजनात यावेळी अशा कोणत्याही चुका करू नका ज्याने देवीची अवकृपा होईल. नवरात्रीत ओढवून घ्याल गरीब..देवीला चुकूनही अर्पण नका करू या गोष्टी..