Navratri 2022 Nine Color: घटस्थापना झाल्यापासून नवमीपर्यंत प्रत्येक दिवशी एका रंगाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. त्या ट्रेंडनुसार लोकं कपडे परिधान करतात. त्यामुळे या दिवसात सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला एका विशिष्ट रंगाचे कपडे परिधान लोक दिसतात. त्यामुळे प्रश्न पडतो की नवरात्रोत्सवात नऊ रंग (Navratri 2022) कसे ठरवले जातात. ज्योतिषशास्त्रात रंगांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. रंग हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असतात. वारानुसार पाहिलं तर आठवड्याला सात दिवस येतात आणि त्या त्या ग्रहाच्या स्वभाव आणि गुणधर्मामुळे रंग असतात. सोमवार (पांढरा), मंगळवार (लाल), बुधवार (हिरवा), गुरुवार (पिवळा), शुक्रवार (गुलाबी), शनिवार (निळा), रविवार (नारंगी, सोनेरी) असे रंग वारानुसार येतात. मग आता नवरात्रीत 9 रंग ठरतात कसे? जाणून घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. नवरात्रीचे नऊ रंग ही देवीची नऊ रुपे आणि त्यानुसार ठरवतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. म्हणून या दिवशी पांढऱ्या रंगाचं महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला पूजा केली जाते. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व आहे. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, म्हणून निळ्या रंगाचं महत्त्व आहे. चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते, म्हणून पिवळ्या रंगाचं महत्त्व आहे.


पंचमीला स्कंदमातेची पूजा केली जाते, म्हणून हिरव्या रंगाचं महत्त्व आहे. षष्ठीला कात्यायनी देवीची पूजा केली जाते म्हमून राखाडी रंगाचं महत्त्व आहे. सप्तमीला कालरात्री देवीची पूजा केली जाते म्हणून नारंगी रंगाचं महत्त्व आहे. अष्टमीला महागौरीची पूजा केली जाते, म्हणून मोरपंखी रंगाचं महत्त्व आहे. नवमीला सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते म्हणून गुलाबी रंगाचं महत्त्व आहे. असं असलं तरी जाणकारांमध्ये नऊ रंगांबाबत मतांतरे आहेत.