Good Days of life: आयुष्य जगताना प्रत्येकाला चांगल्या दिवसांची आस लागलेली असते. चांगले दिवस आयुष्यात यावेत म्हणून लोकं अनेक गोष्टी करतात. पण चांगले दिवस तुमच्या आयुष्यात आले आहेत, हे तुम्हाला कळणार कसं? बाबा नीम करोली यांनी 'अच्छे दिन' ची लक्षणे सांगितली आहेत. आपल्या दिनक्रमात अशी लक्षणे दिसत असतात पण आपले त्याकडे लक्ष नसते.त्यामुळे नीम करोली बाबा यांनी नेमकं काय सांगितलंय ते जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात आधी बाबा नीम करोली यांच्याबद्दल जाणून घेऊया. नीम करौली बाबा हे उत्तराखंडच्या नैनितालमध्ये स्थित कैंची धाम आश्रमाचे प्रसिद्ध संत आहेत. त्यांनी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते 20 व्या शतकातील महान संतांपैकी एक आहेत. बाबांच्या भक्तांमध्ये मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या भक्तांमध्ये भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांचाही समावेश आहे. अॅपल आणि फेसबुकचे मालकही नीम करोलींचे अनुयायी असल्याचे सांगण्यात येते. 


बाबा नीम करौली यांनी जीवन जगण्याचे अनेक नियम सांगितले आहेत. बाबा नीम करोली बाबा यांच्या मते, माणूस चांगले दिवस येण्यापूर्वी अनेक गोष्टी पाहतो. जीवनात आलेले हे शुभ संकेत पुढीलप्रमाणे आहेत. 


साधु-संतांचे दर्शन


ऋषी-मुनींचे दर्शन होणे ही तशी सर्वसाधारण गोष्ट आहे. पण जर तुम्ही दररोज ऋषी-मुनींना पाहिले तर तुमच्या जीवनात शुभ काळ येणार असे समजले जाते. तुमची अडलेली कार्य देवी-देवतांच्या कृपेने होतील. ऋषी-मुनींना पाहणे हे जीवनातील प्रगती आणि यश दर्शवते.


ध्यान करताना डोळ्यात अश्रू


पुजा करताना अनेक वेळा डोळ्यात अश्रू येतात. देवाची पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे हे तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात दर्शवते. याचा अर्थ तुम्ही सर्व दु:खांपासून लवकरच मुक्त होणार आहात.


स्वप्नात पूर्वजांना पाहणे


जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज दिसले तर ते शुभ मानले जाते. स्वप्नात पितरांचे येणे याचा अर्थ त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, असे समजले जाते.


घरात पक्षी आणि प्राण्यांचे आगमन


रोज सकाळी तुमच्या घरी पक्षी येतात का? किंवा गाय भाकरीसाठी दारात येऊन उभी असते? असे होत असेल तर तुमच्या आयुष्यात शुभ दिवस येण्याची चिन्हे आहेत. घरात पशू-पक्ष्यांचे आगमन म्हणजे देवी-देवतांच्या कृपेने सुख-समृद्धी प्राप्त होईल, असे नीम करोली यांचे म्हणणे आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)