Ashok Tree Remedies: नववर्ष 2023 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नवीन संकल्पासह प्रत्येक जण तयारी करत आहे. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे. नव्या वर्षात काही ज्योतिषीय उपाय केल्यास लाभ मिळू शकतो. अशोकाच्या पानांना ज्योतिषशास्त्रात महत्त्व आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अशोक वृक्षाच्या पानांचा उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा मिळेल. अशोक वृक्षाच्या पानांचा उपायामुळे सुख-समृद्धी मिळेल. अशोकाच्या पानांमध्ये (Ashok Leaf) दु:ख नाश करण्याची शक्ति असते. रामचरित मानसमध्ये सांगितल्यानुसार जेव्हा रावणांने सीताहरण केल्यानंतर लंकेत अशोक वाटिकेत ठेवलं होतं. त्यामुळे अशोक वृक्षाचं पौराणिक महत्त्व आहे. या वृक्षामध्ये नकारात्मक उर्जा दूर करण्याची शक्ति आहे.


ज्योतिषशास्त्रानुसार अशोक वृक्षाच्या पानांचा उपाय


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ज्योतिषशास्त्रानुसार अशोक वृक्षाची मुळे घरी आणा आणि धुवून सुकवा. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्या दिवशी तिजोरीत ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तसेच पैशांची अडचण दूर होईल.

  • जातकाच्या विवाहात काही अडचणी येत असेल तर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही अशोकाची पानं टाका. आंघोळीनंतर  ही पानं पिंपळाच्या झाडाच्या खाली ठेवून या. सलग 42 दिवस असं केल्याने लाभ मिळतो. यामुळे विवाहातील अडचणी दूर होतात.

  • अशोक वृक्षाला नियमित जल अर्पित केल्याने कुटुंबाला लाभ मिळतो. तसेच घरात सुख-शांती नांदते. तसेच कुटुंबातील कलहातून सुटका मिळते. तसेच येणाऱ्या अडचणी सौम्य होऊन येतात. 


बातमी वाचा- घरात वटवाघुळ दिसताच मिळतात हे संकेत; वास्तुशास्त्रानुसार काय घडतं?


शुभ कार्यात अशोकाच्या पानांचा वापर केला जातो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. तोरणांमध्येही अशोकाच्या पानांचा वापर होतो. याशिवाय देवी-देवतांना अशोकाची पाने अर्पण करून प्रसन्न होतात. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अशोकाच्या पानांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे नवीन वर्षात हे उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)