New Year Shubh Yog: नव्या वर्षातील `हे` शुभ योग अजिबात चुकवू नका; भरभराटीपासून तुम्ही एक पाऊल दूर
New Year 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच अनेकजण त्यांच्या जीवनात येणाऱ्या वर्षामध्ये नेमकं काय वाढून ठेवलंय यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.
New Year 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच अनेकजण त्यांच्या जीवनात येणाऱ्या वर्षामध्ये नेमकं काय वाढून ठेवलंय यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी याकरता ज्योतिषविद्येचाही आधार घेतला आहे. येणारं वर्ष म्हणजेच 2023 हे वर्ष अनेकांसाठी भरभराटीचं आणि यशाचं वर्ष ठरणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच काही ग्रह त्यांची रास बदलणार असल्यामुळे काही शुभ आणि अशुभ योगही तयार होत आहेत. या साऱ्याचा परिणाम 12 राशींवर पडणार आहे. (New Year 2023 Shubh Yog read details)
विपरीय योग - जानेवारी (January) महिन्यामध्ये तयार होणाऱ्या विपरीय राजयोगाचे थेट परिणाम तुळ, वृषभ आणि धनू या राशींवर होणार आहे. या राशींना हा संपूर्ण काळ फळणार आहे. सोबतच सूर्य, बुध, शुक्र या ग्रहांचंही गोचर होत असल्यामुळं याचे शुभ परिणाम सदरील राशींवर होणार आहेत.
शश राजयोग- नव्या वर्षात सूर्य आणि गुरु आपआपल्या मूळ स्थानी असतील. त्यामुळं हे शुभसंकेत आहेत. 17 जानेवारीला शनि गोचर होत असल्यामुळं शश महापुरुष योग तयार होत आहे. या योगामुळं अनेक राशींसाठी गोड बातमी मिळणार आहे. कुंभ, कन्या, मकर, मेष आणि वृषभ या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग लाभकारी असणार आहे.
हेसुद्धा वाचा : Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय
सिद्ध योग- नव्या वर्षाची सुरुवातच 1 जानेवारीपासून होत आहे. 2023 ची सुरुवात अश्विनी नक्षत्रामध्ये होत असल्यामुळं सकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी शिव आणि त्यामागोमाग सिद्ध योग तयार होतील. कोणताही संकल्प बांधण्यासाठी हा काळ अतीव शुभ आणि फळणारा आहे.
तुम्हीही नव्या वर्षात एखादं शुभकार्य करण्याचा बेत आखत असाल, तर वरीलपैकी एखादा योग तुम्हालाही फळेल. त्यामुळं चांगल्या कामात अजिबात उशीर नको.
नव्या वर्षातील गोचराचे कोणत्या राशींवर परिणाम?
नव्या वर्षात होणाऱ्या गोचरामुळे काही राशी थेट प्रभावित असणार आहेत. ग्रहांची स्थिती पाहता धनु आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणाऱ्या वर्षात काही अडथळे असतील. त्यामुळं कोणताही मोठा निर्णय घेताना प्रचंड विचार करा असाच सल्ला या व्यक्तींना देण्यात येत आहे.
(वरील माहिती सर्वसामान्य धारणांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)