Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. 

Updated: Dec 28, 2022, 07:08 AM IST
Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय  title=
Gochar Rashi Parivartan Planetary Transit in 2023 and its effect astro latest news

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. ज्योतिषविद्येच्या अभ्यासकांच्या मते नव्या वर्षात गुरू, शनि आणि राहू- केतू रास बदलणार आहेत. गुरु 24 नोव्हेंबरपासून मीन राशीत सरळ चाल चालत होता. जो 22 एप्रिल 2023 ला मेष राशीमध्ये प्रवेश करेल. न्यायदेवता अशीही ओळख असणारा शनि 30 ऑक्टोबर 2023 ला गोचर करत कन्या राशीमध्ये प्रवेश करेल (Shani Gochar 2023). (Gochar Rashi Parivartan Planetary Transit in 2023 and its effect astro latest news )

राशींवर होणार मोठे परिणाम 

प्रत्येक ग्रह ज्यावेळी रास बदलतो तेव्हा तो ज्या राशीतून निघतो आणि ज्या राशीमध्ये जातो अशा दोन्ही राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. थोडक्यात पुढच्या वर्षातील ग्रहांची एकंदर स्थिती पाहता धनु आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारं वर्ष काहीसं अडचणींचं असेल. त्यामुळं कोणताही मोठा निर्णय घेताना प्रचंड विचार करावा लागणार आहे. (Finance) आर्थिक निर्णय घेताना या राशीच्या मंडळींनी इतरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम ठरेल. 

कन्या - सिंह राशीचा सामाजिक स्तर उंचावेल 

कन्या - सिंह राशीसाठी येणारं वर्ष हे संमिश्र घडामोडींचं असेल. निवडक कामांमध्ये येणारं अपयश वगळता या राशीच्या व्यक्तींच्या वाट्याला यश येणार आहे. पण, या व्यक्तींनी एक करावं, रागावर नियंत्रण ठेवावं. (Spiritual Events) पूजाअर्चा करण्यावर भर द्यावा. रागावर ताबा ठेवावा. या राशींच्या व्यक्तींना समाजात मिळणारा मान आणखी वाढणार आहे. प्रगतीच्या वाटेवर त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. 

कुंभ, मकर आणि मीन राशीच्या व्य़क्तींनी पुढच्या वर्षामध्ये आरोग्याची (health) काळजी घ्यावी. या व्यक्तींनी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये (Eating habits) हलगर्जीपणा करु नये. आरोग्याच्या हितासाठी सर्व चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात. या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कामात यश मिळणार आहे. त्यामुळं प्रयत्न करणं सोडू नका. 

मतभेद टाळा 

वृषभ आणि मेष रास असणाऱ्यांसाठी 2023 या वर्षात काही बाबतीत मतभेद होऊ शकतात. पण, याच मतभेदांच्या धर्तीवर कोणताही निर्णय घेण्याची चूक करु नका. मोठ्यांचे सल्ले ऐका, मित्रांशी चर्चा करा. अतिघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, त्याचा फायदा होणार नाही. 

ग्रहताऱ्यांची स्थिती आणि त्याचे आयुष्यावर होणारे परिणाम या साऱ्यावर अनेकजण विश्वास ठेवतात तर, अनेकांना यावर विश्वास नसतो. पण, एक गोष्ट कायम ध्यानात असणं कधीही उत्तम, की आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा खुप नवे अनुभव देणारा आणि खुप काही शिकवून जाणारा असतो. त्याच्याकडून तुम्ही काय प्राप्त करता हे महत्त्वाचं. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)