Shani Asta 2024 : नवीन वर्ष 2024 ची सुरुवात `या` राशीच्या लोकांसाठी घातक, शनिदेव अस्तामुळे आयुष्यात मोठी उलथापालथ
Shani Asta 2024 : नवीन वर्षाची सुरुवात काही राशींच्या लोकांसाठी हानीकारक ठरणार आहे. शनि अस्तामुळे काही लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. कुठल्या राशींसाठी तो घातक ठरणार आहे जाणून घ्या.
Shani Asta 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा कर्म आणि न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. शनि सर्वात संथी गतीने आपली रास बदलतो. शनिदेव एका राशीत तब्बल अडीच वर्ष भ्रमण करत असतो. या वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव स्वगृहात कुंभ राशीत विराजमान आहे. नवीन वर्षात 2024 मध्येही शनि कुंभ राशीत असणार आहे. या काळात शनि मावळेल, उगवेल आणि मागे जाणार आहे.
नवीन वर्ष 2024 मधील दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी 11 ला ते 18 मार्च 2024 पर्यत शनि अस्त असणार आहे. त्यानंतर तो मार्गी होणार आहे. शनिच्या अस्त स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे, याचा परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे का जाणून घ्या. (New Year 2024 is dangerous for people of these zodiac sign financial problems and great upheaval in life due to Saturn declination or shani asta 2024)
मेष रास (Aries Zodiac)
मेष राशीच्या अकराव्या घरात शनि असणार आहे. शनिच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना वादळ येणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. गुंतवणुकीसाठी भयानक ठरणार आहे. आर्थिक परिस्थितीवर काही विपरीत परिणाम कारक ठरणार आहे. शनिदेवाची ही स्थिती 18 मार्चला शनिचा उदय होईपर्यंत सहन करावा लागणार आहे. त्याशिवाय कौटुंबिक समस्या उद्भवू लागणार आहे. आरोग्याची थोडी काळजी घेण्याची गरज आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
या राशीच्या नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनि असून त्याचा कुंभ राशीत प्रवेश झाल्यामुळे तो या राशीच्या दहाव्या घरात विराजमान असणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात शनि अस्त होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शनि अस्त अडचणीचा ठरणार आहे. खूप प्रयत्न करूनही तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवता येणार नाही. या काळ तुमच्यासाठी तणावपूर्ण असणार आहे. व्यवसायातही हानी होणार आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी समस्या सहन करावी लागणार आहे. या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
कन्या रास (Virgo Zodiac)
शनि हा या राशीच्या सहाव्या आणि पाचव्या घराचा स्वामी असून तो सहाव्या भावात स्थिर असणार आहे. शनिच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. या लोकांना कठोर परिश्रम करूनही यश मिळविण्यात अडथळं निर्माण होणार आहे. शनि अस्तामुळे कुटुंबात काही मुद्द्यावरून वादविवाद होणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज आहे.
हेसुद्धा वाचा - Mercury Gochar 2023 : दिवाळीपूर्वी बुधदेवाचा शत्रूच्या घरात प्रवेश, 'या' राशींच्या लोकांना धनहानीसोबतच आरोग्याची समस्या
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)