मुंबई: ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूची कृपा मिळावी यासाठी पूजा आणि उपवास ठेवला जातो. निर्जला एकादशीला भीमसेन एकादशी असेही म्हणतात. यावेळी ही एकादशी 10 जून रोजी येत आहे. सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचे व्रत सर्वात कठीण आहे. धार्मिक दृष्टिकोनातून या व्रतामध्ये अन्न, पाणी आणि फळे घेतली जात नाहीत. उपवासाचे नियम व्यवस्थित पाळले तरच उपवासाचे फळ मिळते. चला जाणून घेऊया निर्जला एकादशी उपवासाचे नियम.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ज्योतिषशास्त्रानुसार निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी दशमी तिथीच्या संध्याकाळपासून अन्न खाऊ नये. या दिवशी फक्त फळे, पाणी, रस इत्यादी घ्यावं. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. आंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावे.

  • घरातील पूजेच्या ठिकाणी जाऊन देवाला नमन करा आणि संकल्प करा. निर्जला दिवसभर व्रत ठेवा. या दिवशी फक्त देवाचं नामस्मरण करा. 

  • उपवास दरम्यान वृद्ध आणि महिलांचा आदर करा. शक्य असल्यास रात्री झोपू नका. त्यापेक्षा देवाचे ध्यान करा. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून विधिपूर्वक पूजा करावी.

  • गरीब आणि ब्राह्मणांना अन्नदान करा. केवळ शुभ मुहूर्तावरच उपवास सोडावा. एकादशीच्या व्रतामध्ये पारणाचेही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शुभ मुहूर्तावर उपवास सोडा. निर्जला एकादशीला पारणाचा मुहूर्त 11 जून रोजी पहाटे 5.49 ते 8.29 पर्यंत आहे.