Weekend Horoscope 5 November 2022 : आठवड्याचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती जाणून घ्या. साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष रास
भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तो तुमच्या मुलांच्या हितास हानी पोहोचवू शकतो. एकाद्या फसव्या योजनेत गुतंवणूक करण्याचे टाळा. गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी महत्त्वाचे घडेल, ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद मिळेल. 


सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या


वृषभ रास
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून आपुलकीची अपेक्षा करत असाल तर आजचा दिवस तुमच्या अपेक्षांवर खरा ठरेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याची योजना आखू शकता आणि चांगल्या हवामानाचा आनंद घेऊ शकता. आज आर्थिक बाजू मजबूत असेल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल.


मिथुन रास
आज तुमची काही महत्त्वाचे कामं पूर्ण होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळतील, त्यांचा फायदा घ्या. कुटुंबातील ज्येष्ठांकडून तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य मिळेल.


कर्क रास
आपल्या कठोर वागण्यामुळे तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. अशी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, त्याच्या परिणामांचा विचार करा. शक्य असल्यास, मूड बदलण्यासाठी प्रयत्न करा किंवा दुसरीकडे जा.


सिंह रास
आज तुमचा दिवस सामान्य असेल. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित असलेले लोककोणत्याही सामाजिक कार्यक्रमाला जाऊ शकतात. तिथे सर्वांचे लक्ष तुमच्या बोलण्याकडे असेल. आज वाहन चालवताना काळजी घ्या. कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


कन्या रास
प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल. प्रवासात वाहन जपून चालवा. कुटुंब आणि मित्रांच्या सहकार्याने मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. आरोग्याबाबत सावध राहा.


तुळ रास
तुम्हाला खूप दिवसांपासून जाणवत असलेला थकवा आणि तणावातून आराम मिळेल. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे. रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त पैसे गुंतवले जाऊ शकतात.


वृश्चिक रास
आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. क्षेत्रातील तुमची प्रगती काही अडथळ्यांमुळे अडकून पडू शकते, तुम्ही संयम बाळगावा. आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. आज तुमचा दिवस कुटुंबियांसोबत जाईल.


धनु रास
लोकांना आज कार्यक्षेत्रात मान मिळू शकतो. भगवान भोलेनाथांच्या कृपेने धनाची प्राप्ती होईल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. प्रॉपर्टी डीडमुळे मोठा नफा मिळू शकतो. खर्च वाढतील, धनु राशीच्या लोकांची कलात्मक आणि सर्जनशील शक्ती वाढेल. नात्यात गोडवा वाढेल.


मकर रास
मिरची जशी अन्नाला चविष्ट बनवते, त्याचप्रमाणे जीवनात काही दु:खही आवश्यक असते आणि मगच सुखाची खरी किंमत कळते. आर्थिक बाबतीत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मुलाच्या शिक्षणाची काळजी करण्याची गरज नाही.


कुंभ रास
आज तुमचा कल धार्मिक कार्याकडे राहील. आजचा दिवस नातेवाईकांसोबतचे नाते पुन्हा नव्याने वाढवण्याचा आहे. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. या राशीचे विवाहित लोक आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी चांगली योजना करू शकतात.


मीन रास
 या राशींच्या लोकांना आज नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. सामाजिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)