29 June 2022 Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकांवरही ग्रहांचा अंमल असतो. 1 ते 9 या अंकांवर ग्रहांचा प्रभाव असतो. अंकशास्त्राच्या गणनेमध्ये, एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 11 जून रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 1+1=2 आहे. म्हणजेच 2 ला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. तर जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष यांची बेरीज भाग्यांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-2022 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+3+0+4+2+0+2+2=15=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. तर तुमच्या मूलांकाआधारे तुमचे तारे 29 जूनसाठी अनुकूल आहेत की नाही? अंकशास्त्राद्वारे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अंक 1:  निर्णय घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. अतिरिक्त . दिवस चांगला आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल.


  • शुभ अंक - 3

  • शुभ रंग- हिरवा


अंक 2: तुमच्या वस्तू सांभाळा नाहीतर हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. नवीन योजनांवर काम करू शकाल. प्रेमसंबंधांमध्ये दीर्घकाळ टिकणारे नाते निर्माण होईल. 


  • शुभ अंक  - 22

  • शुभ रंग - निळा


अंक 3: आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. मानसिक तणाव आणि थकवा हे या समस्येचे कारण असू शकते. घर किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमच्या प्रियकराचा मूड रोमँटिक असेल. 


  • शुभ अंक  - 9

  • शुभ रंग - हिरवा


अंक 4: जुने मित्र भेटू शकतात आणि नवीन मित्र देखील बनतील. सकारात्मक विचाराने जीवनात प्रगती होईल.


  • शुभ अंक - 14

  • शुभ रंग - पांढरा


अंक 5: वेळ वाया घालवण्यापेक्षा चांगले काम करा. तुमचा खर्च वाढू शकतो. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. 


  • शुभ अंक - 21 

  • शुभ रंग - जांभळा


अंक 6: आज तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता. 


  • शुभ अंक - 8

  • शुभ रंग - पिवळा


अंक 7: कौटुंबिक जीवनात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुमचा साधा स्वभाव आज तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येईल. 


  • शुभ अंक - 10

  • शुभ रंग - पिवळा


अंक 8: तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. व्यावसायिक कामात जास्त फायदा होऊ शकतो. प्रियकर आणि प्रेयसीमध्ये भांडण होऊ शकते ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. 


  • शुभ अंक - 4

  • शुभ रंग - निळा


अंक 9: तुम्ही लग्नाचे नियोजन करू शकता. आरोग्याबाबत सावध राहा सरकारी प्रकरणांमध्ये वकिलाचा सल्ला घेण्यासाठी चांगला दिवस आहे.


  • शुभ अंक -9

  • शुभ रंग - पिवळा


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)