मुंबई : अंक ज्येतिष (Numerology )नुसार जन्मतारीख, वेळ या गोष्टींचं व्यक्तीच्या आयुष्यात अतीव महत्त्वाचं स्थान असतं. सरळसाधे दिसणारे आकडे आपल्या आयुष्यावर इतका प्रभाव पाडतात, की विचारही करणं अशक्य. त्यामुळंच अनेकदा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ज्योतिषविद्येचा आधार घ्यायला गेलात, तर तिथं तुमचा मुलांक विचारला जातो. (numerology how to know lucky number and related astrology read details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा ओळखाल मूलांक? (Numerology hacks)
मूलांक ओळखण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम जन्मतारखेच्या (Birth date) दोन्ही आकड्यांना जोडा. एकच आकडा असल्यास तो तुमचा मूलांक असतो. अन्यथा बेरीज करून येणारं उत्तर म्हणजे तुमचा मूलांक. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 11 आहे. तर 1 + 1 = 2 म्हणजेच 2 हा तुमचा मुलांक. 29 जन्मतारीख असल्यासही तुमचा मुलांक 2 असतो. उदाहरणार्थ 2+9 = 11 एकेरी आकड्यासाठी पुन्हा 1+1= 2 म्हणजेच मूलांक 2. 


मूलांक 2 असल्यास भाग्योदयासाठी कोणता आकडा महत्त्वाचा? 
चंद्रबळ (Moon) असणाऱ्या 2 या मूलांकासाठी 1 आणि 5 हे आकडे अनुकूल आहेत.  3, 6, 8, 9 हे आकडे या मूलांकाच्या व्यक्तींसाठी फारसे फायद्याचे नाहीत. 


2 हा मूलांक असणाऱ्यांसाठी रविवार, सोमवार, बुधवार हे तिन्ही दिवस शुभ आहेत. वयाचं 24 वं वर्ष या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं. तर, 16 जुलैपासून 16 ऑगस्टपर्यंतचा काळ या व्यक्तींसाठी सर्वात शुभ असतो. 


October Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही


 


(Astrology) अंकज्योतिषामध्ये दिलेल्या माहितीनुसार 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्यांसाठी सफेद, शेंदरी, हिरवा असे रंग फायद्याचे ठरतात. ज्योतिषाच्या सल्ल्यानं या मंडळींनी मोती धारण केल्यास त्यामुळं लाभ होतो. 


(वरील माहिली सर्वसामान्य मन्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)