अंकशास्त्रानुसार 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी Luck मजबूत करण्यासाठी `या` रंगांनी होळी खेळावी!
Holi NumerologyTips in Marathi : 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी होळीचा उत्साह आयुष्यात सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी काय करावं याबद्दल अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केलंय.
Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि सुख आणावं, अशीच इच्छा असते. त्यासाठी मोठ्या भक्तीभावाने आपण होलिका दहनाची पूजा करत असतो. होळीला रंगांची उधळण करत असतो. या होळीच्या सणाला तुमच्या आयुष्यात अधिक द्विगुणीत करण्यासाठी अंकशास्त्रात 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे हा होळीचा उत्साह तुमच्या आयुष्यातही सगळे रंग अगदी अधिक रंग भरेल.
अंकशास्त्रानुसार 7, 16, 25 या तारखेला ज्यांचा जन्म झालेला असतो त्या लोकांनाचा मूलांक हा 7 असतो. अंकशास्त्रतज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी होळीच्या दिवशी काही उपाय सांगितले आहे. तुमच्या मूलांकानुसार कुठल्या रंगाचे कपडे परिधान करावे, कुठल्या देवाची आराधना करावी, कुठल्या रंगाने होळी खेळावी अशा अनेक गोष्टीबद्दल सांगितलंय. (numerology prediction do these upay on holi with people born on date 7 16 25 ank shashtra)
हेसुद्धा वाचा - Holika Dahan 2024 : करिअरमधील अडथळे, आयुष्यातील नकारात्मकता अशी करा दूर! होलिका दहनाच्या दिवशी करा हा उपाय
होळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी 7 मूलांक लोकांनी काय करावं?
अंकशास्त्रानुसार 7 हा क्रमांक केतू ग्रहाचा कारक आहे . या मूलांकाची लोक अधिक भावनिक असतात. 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी होळीच्या दिवशी उठल्यानंतर सर्वात पहिले गुरुचे आशिर्वाद घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमच्या दोन्ही कानाच्या मागे थोडीशी हळद किंवा केशर लावा आणि त्यानंतर होळीचा आनंद लुटावा. होळीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्याचे कपडेशिवाय पेस्टल शेड्सचे कपडे घालू शकता. पेस्टल शेड्स हे तुमच्या लकला अधिक मजबूत करतो.
त्यामुळे होळीच्या दिवशी फिकट रंगांसोबत मजा करावी. फिकट पिवळा, पांढरा, फिकट हिरवा, गुलाबी, एक्वा ब्लू आणि फिकट निळा रंगाने होळी खेळावी. होळीच्या दिवशी धार्मिक जागी किंवा धार्मिक स्थळी, मंदिरात त्रिकोणी झेंडा लावून नवीन सुरुवात करावी. या उपायामुळे तुमचा मान सन्मान वाढतो. त्याशिवाय चांगल्या लोकांच समर्थन, सहकार्य तुम्हाला लाभेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)