ऑक्टोबर 2022 या 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार खास? होणार आर्थिक भरभराट
ऑक्टोबर 2022 या 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार खास? होणार आर्थिक भरभराट
Rashifal : ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिना हा 5 राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात देखील झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात करवा चौथ, दसरा, दिवाळी आणि भाईबीज यासारखे प्रमुख सण देखील येणार आहेत. सणासुदीच्या काळात लोकांचा खर्च खूपच वाढ असतो. मात्र या महिन्यात नोकरदार आणि व्यापारी वर्गाचे उत्पन्नही वाढते. ज्योतिषशास्त्राच्या मते या महिन्यात पाच राशीच्या लोकांना धनप्राप्ती होईल.
मेष (Aries) - मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या महिन्यात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा पगार वाढू शकतो किंवा तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात.
सिंह (Leo) - आर्थिक दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स चांगला राहील. सरकारी क्षेत्रातूनही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक प्रयत्नही आर्थिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील.
वृश्चिक (Scorpio) - वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे, परंतु जास्त खर्चामुळे तुम्ही संपत्ती जमा करण्यात अपयशी ठराल. परदेशाशी संबंधित व्यवसायात किंवा परदेशाशी संबंधित कंपनीत काम करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहील. कपडे, खेळणी, खाणेपिणे, मार्केटिंग, मनोरंजन इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या लोकांनाही फायदा होईल.
धनु (Saggitarius) - या राशीच्या लोकांना संपत्तीचा लाभ आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. जे लोक जमीन आणि मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius) - ऑक्टोबरमध्ये तुम्हाला आर्थिक बळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनपेक्षित फायदा होऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. यासोबतच परदेशातून पैसा येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. कुटुंबाकडून जमीन आणि मालमत्तेच्या रूपाने लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. कमी मेहनत करूनही तुम्हाला अधिक लाभ मिळतील.
कन्या (Virgo) - ऑक्टोबर महिन्यात कन्या राशीच्या लोकांना थोडे सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. सणांच्या काळात खर्च वाढणार आहे. चुकीच्या निर्णयामुळे व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. आर्थिक जीवनाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.