Shukra In Tula Rashi: ज्योतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित काळानुसार, राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शुक्र ग्रहाची हालचाल फार महत्त्वाची मानली जाते. शुक्र ठराविक काळानंतर राशी बदलत राहतात. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र कन्या राशीमध्ये असून नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजेच 30 तारखेला शुक्र गोचर करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 12:05 वाजता शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. शुक्र तूळ राशीत गेल्याने कोणत्या राशींना बंपर लाभ होणार आहे हे पाहूया.


मेष रास (Mesh Zodiac)


शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या कालावधीत ते करणं फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय उघडू शकता. वैवाहिक आणि लव्ह लाईफही खूप चांगले जाणार आहे. या काळात लग्न होण्याची शक्यता आहे. चांगल्या जोडीदाराच्या मदतीने लग्नाची तारीखही निश्चित होऊ शकते. तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल.


कर्क रास (Kark Zodiac)


कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचं तूळ राशीत प्रवेश करणं खूप फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक जीवन चांगले जाईल. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते. तुम्हाला अनेक मोठी कामे करण्याची प्रेरणा मिळणार आहे. नवीन घर घेण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणारे लोक मोठ्या आर्थिक लाभासह यश देखील मिळवू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. 


कन्या रास (Kanya Zodiac)


शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार असून या राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. या काळात तुम्ही देश-विदेशात फिरायला जाऊ शकता. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. तुम्हाला नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )