पती पत्नीमधील सातत्याने होणारे वाद या रत्नामुळे मिटतात; संसारात परततो आनंद
हे रत्न परिधान केल्याने पती-पत्नीमधील वाद मिटतात. संसारात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण होतं. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी हे रत्न खूप उपयुक्त ठरते.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहासाठी वेगवेगळ्या रत्नांचे तपशीलवार वर्णन केले आहे. ज्योतिषी मानतात की रत्नांचा जीवनावर विशेष प्रभाव पडतो. ज्योतिषी ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी रत्न घालण्याचा सल्ला देतात. वैवाहिक जीवनातील त्रास दूर करण्यासाठी 'ओपल' रत्न प्रभावी मानले जाते. ओपल रत्नाचे फायदे आणि ते परिधान करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.
ओपल कसे घालायचे
ज्योतिषशास्त्रानुसार ओपल कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी घातला जाऊ शकतो. या दिवशी ते अनामिकामध्ये धारण करावे. हे रत्न धारण करण्यापूर्वी कच्चं दूध आणि गंगाजलाने शुद्ध करावं.
यानंतर पांढऱ्या कपड्यावर ठेवून ‘ओम द्रौं द्रौंस: शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा. पती-पत्नीमध्ये विनाकारण कलहाची स्थिती कायम राहिल्यास किंवा घटस्फोटाची परिस्थिती उद्भवू लागल्यास पती-पत्नीने ओपल घालावे. असे केल्याने पती-पत्नीचे नाते मधुर राहते.
मानसिक तणाव कमी होण्यास मदत
ज्योतिषशास्त्रानुसार ओपल हे शुक्राचे रत्न आहे. ते परिधान केल्याने सौंदर्य आणि आकर्षकता वाढते. यासोबतच या दगडाच्या प्रभावामुळे मानसिक तणाव कमी होतो. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीच्या आत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)