Palmistry: तळहातावर अशा हस्तरेषा असतील तर सावधान, कारण...
हातावरील काही रेषा अनेक गोष्टींना जबाबदार असू शकतात.
मुंबई : हातावरील रेषा सांगतात की, व्यक्ती कोणत्या स्थितीत आहे. ती संबंधित व्यक्ती त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे की नाही. त्याचप्रमाणे, तो खूप हुशार आणि व्यावहारिक आहे. काही लोकांच्या आयुष्यात वारंवार फसवणूक झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यामागे हाताच्या काही रेषा जबाबदार असू शकतात. आज आपण अशाच काही हस्तरेषांबद्दल जाणून घेणार आहोत.
हातावरील अशा रेषांमुळे होतं नुकसान
काही लोकांचं प्रत्येक बाबतीत सतत नुकसान होतं, मग ते नातं असो किंवा पैसा. असे लोक इतरांच्या बोलण्यात सहज अडकतात आणि भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेतात. हाताच्या रेषांवरून हे सहज ओळखता येऊ शकतं.
जर हृदयाची रेषा मस्तिष्क रेषेवरून जात तर असे लोक त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हे लोक भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतात आणि नात्यात फसू शकतात. याशिवाय अशा लोकांना आर्थिक बाबतीतही खूप त्रास होण्याची शक्यता असते.
तसेच हृदयरेषा मस्तिष्क रेषेवर जात असून ती कापत असेल तर त्याला शुभ लक्षण म्हणता येणार नाही. असे लोक वारंवार फसवणुकीला बळी पडण्याची दाट शक्यता असते.
जर हृदयाची रेषा मस्तिष्क रेषेवर पूर्णपणे पडलेली असेल तर अशा लोकांना पैसा आणि भावनिक पातळीवर खूप त्रास होतो आणि यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचू शकतं.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)