मुंबई : असे बरेच लोक आहेत, जे आपल्या भविष्याबद्दल विचार करुन कुठेतरी आपले पैसे गुंतवतात. जेणेकरून त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहील. पण गुंतवणूक करून चांगला नफा मिळवणे हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. त्यासाठी दूरदृष्टी, बाजार समजून घेणे आणि जोखीम घेणे देखील असते. ज्यामुळे पैसे जमा करणयासाठी अनेक कौशल्ये आवश्यक आहेत. याशिवाय पैसे कमावण्यासाठी नशिबाचीही गरज असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या हातावरील रेखा या तुमचं भविष्य सांगतात. त्यामुळे हस्तरेखामध्ये कोणत्या लोकांना गुंतवणुकीचा नफा मिळेल आणि कोणत्या लोकांना तोटा सहन करावा लागेल, हे देखील सांगितलं जातं.


चला तर जाणून घेऊ या की, कोणत्या लोकांसाठी गुंतवणूक करणं नफ्याचं आहे आणि कोणत्या लोकांसाठी तोट्याचं.


ज्या लोकांच्या हातातील व्यवसायाची रेषा बुध पर्वताखाली येते. असे लोक गुंतवणुकीतून जोरदार परतावा मिळवतात.


तळहातावर जीवनरेषा स्पष्ट असेल आणि शुक्र पर्वतावर बॉक्ससारखा आकार तयार झाला असेल तर अशा लोकांनाही गुंतवणुकीचा फायदा होतो.


ज्या लोकांच्या हातातील चंद्र पर्वतावरून दोन रेषा निघतात आणि भाग्यरेषेवर भेटतात, अशा लोकांना गुंतवणुकीच्या कामातही भरपूर यश मिळते. असे लोक मोठे स्टॉक ट्रेडर्स देखील करु शकतात.


ज्या लोकांच्या हातात गुरु पर्वतावर बॉक्स बनवला आहे, ते शेअर बाजारातून भरपूर पैसे कमावतात. मात्र अशा लोकांना नुकसानाचा देखील धोका आहे.


जीवनरेषेतून बाहेर पडणाऱ्या रेषा गुरूच्या पर्वतावर बनवलेल्या चौकटीला स्पर्श करत असतील, तर असे लोक गुंतवणुकीत इतरांची मदत घेऊन पैसे कमावतात. ते प्रॉपर्टी ब्रोकर असू शकतात.
   
ज्या लोकांच्या हातात जीवनरेषेतून रेषा निघत आहेत, त्यांनी गुरु पर्वतावरील चौक ओलांडून पुढे गेल्यास, अशा लोकांनी खूप विचारपूर्वक गुंतवणुकीत पैसा गुंतवावा. त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)