Palmistry Lucky Signs: हस्तरेषा शास्त्रात तळहातावरील चिन्हांना खूप महत्त्व आहे. या चिन्हांमुळे भविष्याचा वेध घेतला जातो. हाताचा आकार, लवचिकपणा, बोटं, अंगठा, शुक्रकंकण, शनिकंकण, आयुष्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा, रविरेषा, बुधरेषा, मंगळरेषा, अंतरज्ञानरेषा, विवाहरेषा या सर्वांचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक आयुष्य ते प्रोफेशनल लाईफपर्यंत या चिन्हांवरून बरंच काही कळते. आम्‍ही तुम्‍हाला तळहातच्‍या या खास खुणांबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्तीचं चिन्ह- हस्तरेषाशास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर हत्तीचे चिन्ह असेल तर त्याची बुद्धी तीक्ष्ण असते. अशा लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. व्यवसायातून नफा मिळण्याची संधी नेहमीच असते. हातावर हत्तीचं चिन्ह असलेले लोक आनंदी जीवन जगतात.


मत्स्य चिन्ह- तळहातावर माशाचे चिन्ह व्यक्तीसाठी फलदायी ठरते. हे चिन्ह व्यक्तीसाठी शुभ असते आणि त्याच्या नशिबात परदेश प्रवासाची शक्यता असते. असे लोक श्रीमंत असतात आणि आनंदी जीवन जगतात.


पालखीचं चिन्ह- तळहातावर पालखीचे चिन्ह असलेल्यांना नशिबाची साथ मिळते. असे चिन्ह असलेले लोक विलासी जीवन जगतात. लक्झरी लाईफसह अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते.


स्वस्तिक चिन्ह- हस्तरेषाशास्त्रात तळहातावरील स्वस्तिक चिन्हाचा अर्थ भाग्याशी जोडून सांगितला जातो. अशा लोकांना नशीब नेहमीच साथ देते. असे लोक शैक्षणिक क्षेत्रात चांगले करिअर करतात. अशा लोकांना खूप मान मिळतो. हातावर या चिन्हाचे लोक उच्च पदावर बसतात.


कलश चिन्ह- तळहातावरील कलशाची खूण असलेल्या व्यक्तींना आध्यात्माची ओढ असते. असे लोक उपासनेत बराच वेळ घालवतात आणि या धार्मिक क्षेत्रांमध्ये खूप प्रभाव असतो. असे लोक धार्मिक दौरे आणि धर्माचा प्रचारही करतात.



जहाज चिन्ह- जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर जहाजाचे चिन्ह असेल तर ती व्यक्ती भाग्यवान असते. पैसा आणि अन्नधान्याची कमतरता नसते. परदेशातही व्यवसायाच्या चांगल्या संधी निर्माण होतात.


Palmistry: हातावरील या रेषेमुळे भाग्य उजळतं, लग्नानंतर मिळतो पैसाच पैसा!


सूर्य चिन्ह- तळहातावर सूर्य चिन्ह शुभ मानले जाते. अशा लोकांमध्ये कुशाग्रता असते आणि श्रीमंतही असतात. त्यांच्या जीवनात कधीही कोणताही अडथळा येत नाही आणि त्यांचे जीवन आनंदाने व्यतीत होते.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)