Palmistry: तुमच्याही हातावर अशा रेषा असतील तर जीवनात मिळेल भरपूर प्रेम; पहा तुमची लव्ह लाईन काय म्हणते?
जाणून घेऊया तुमच्या हाताच्या रेषा काय म्हणतात.
मुंबई : तुम्ही कधी तुमचा तळहात नीट निरखून पाहिला आहे का? तळहातावरची एक ओळ कशी वळते आणि दुसरीशी कशी मिळते? खरं तर या ओळी तुमच्याबद्दल खूप काही सांगून जातात. या ओळींमध्ये तुमचं नशीब दडलेलं आहे असं म्हटलं जातं.
ज्यांना हस्तरेषाशास्त्राचं ज्ञान असणारे तुम्हाला तुमचा तळहात पाहून इतक्या गोष्टी सांगतील की, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जाणून घेऊया तुमच्या हाताच्या रेषा काय म्हणतात.
आज आपण तळहातातील लव्ह लाईन म्हणजेच प्रेम रेषेबद्दल जाणून घेऊया. या रेषा तुमच्या जीवनातील प्रेमाची स्थिती सांगतात. तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल, लव्ह मॅरेज होईल की नाही. या सगळ्याची माहिती तुमची लव्ह लाईन सांगू शकते.
कुठे असते लव्ह लाईन
जर तुमच्या तळहातावर लव्ह लाईन असेल तर तुम्ही समजू शकता की, तुमचा प्रेम विवाह होणार आहे. गुरूच्या पर्वतावरून या रेषांची माहिती मिळण्यास मदत होते. जर तुमच्या तळहातावर गुरू पर्वतावर क्रॉस रेषा असेल तर प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे. तुमचा जीवनसाथीही चांगला असेल आणि खूप प्रेम देईल.
अशा व्यक्तींना मिळतो भाग्यशाली रेषा
जर तुमच्या तळहातात हृदय रेषेपासून काही लहान रेषा सूर्य रेषेपर्यंत पोहोचल्या तर अशा स्थितीत प्रेमविवाहाचा योग तयार होतो. अशा परिस्थितीतही त्या व्यक्तीला खूप चांगला जीवनसाथी मिळण्याची शक्यता असून जोडीदाराची साथ मिळते. जोडीदाराच्या पाठिंब्याने त्या व्यक्तीला यशस्वी जीवन मिळते.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)