मुंबई : तुमच्या हातावरील रेषा तुमचं नशीब ठरवत असतात. हस्तरेषा शास्त्रानुसार, या रेषा माणसाला आयुष्य बनवूही शकतात आणि उद्ध्वस्तही करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच रहस्यमय रेषांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या तारांचा संबंध आपल्या नशिबाशी आहे. हस्तरेषाशास्त्रात त्याला 'मिस्टिक क्रॉस' म्हणतात. अशी रेषा हातावर असणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलतं जाणून घ्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वभाव कसा असतो?
ज्या माणसांच्या तळहातावर हा मिस्टिक क्रॉस असतो ते जीवनात खुप यशस्वी ठरतात. ही माणसं खूप धार्मिक असतात आणि लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. इतरांच्या सुख-दुःखाची त्यांना नेहमी काळजी असते. आजच्या कलियुगात अशा लोकांना देव मानले जाते. हे लोक इतरांच्या कामात कधीच अडथळे निर्माण करत नाहीत.


आकर्षित व्यक्तिमत्व 
मिस्टिक क्रॉस हातावर असणारी व्यक्ती इतरांना आकर्षित करण्यात चांगले असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात असा गुण असतो की लोकांना स्वतःला त्यांच्या जवळ यायला आवडते. हे लोक केवळ त्यांच्या वर्तनानेच नव्हे तर आश्चर्यकारक सर्जनशीलतेने लोकांना प्रभावित करण्यास चांगले जाणतात.
 
यशस्वी होतात?

ज्या लोकांच्या हातात हा मिस्टिक क्रॉस असतो, ते आयुष्यात खूप मोठी उंची गाठतात. त्यांच्या आयुष्यात प्रसिद्धी आणि पैसा येतो. हे लोक खूप हुशार असतात आणि त्यांच्या ज्ञानाची पातळी सामान्य लोकांच्या तुलनेत जबरदस्त असते. या लोकांना आर्थिक आघाडीवर कधीही अडचणी येत नाहीत. पैसा आणि पैसा नेहमी चालत त्यांच्याकडे येतो. बँक-बॅलन्स सांभाळण्याची जबरदस्त कला या लोकांकडे असते.