Papmochani Ekadashi 2023 : पापमोचनी एकादशीला 3 अद्भुत योग, श्रीहरीची पूजा करुन आर्थिक संकटावर करा मात
Papmochani Ekadashi 2023 : चैत्र महिन्यातील एकादशी ही पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला 3 अद्भुत योग जुळून आले आहेत. कधी आहे ही एकादशी शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घेऊयात...
Papmochani Ekadashi 2023 : चैत्र महिन्यातील पहिली एकादशी ही खूप खास आणि भाग्यशाली ठरणार आहे. कारण यंदा एकादशीला 3 अद्भुत योग घडतं आहेत. हिंदू धर्मानुसार ही एकादशी हरी विष्णूला समर्पित केली गेली आहे. चैत्र महिन्यातील एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचन एकादशी पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी मानली जाते. अशी ही एकादशी कधी आहे, मुहूर्त, विधी आणि मंत्राबद्दल जाणून घेऊयात. (Papmochani Ekadashi March 2023 Know date auspicious yoga vrat time tithi shubh muhurat puja vidhi mantra and ritual of Chaitra Ekadashi in marathi)
पापमोचनी एकादशी 2023 मुहूर्त (Papmochani Ekadashi 2023 muhurat)
चैत्र कृष्ण एकादशी तारीख सुरु - 17 मार्च 2023 सकाळी 02.06
चैत्र कृष्ण एकादशी तिथी समाप्त - 18 मार्च 2023 सकाळी 11.13
उपवासाची वेळ - 19 मार्च 2023 सकाळी 06.27 - 08.07
पूजा मुहूर्त - 07:58 am - 09:29 am
पापमोचनी एकादशी 2023 शुभ योग (Papmochani Ekadashi 2023 shubh yoga)
द्विपुष्कर योग - सकाळी 12:29 - सकाळी 06:27 (19 मार्च 2023)
सर्वार्थ सिद्धी योग - 18 मार्च सकाळी 06:28 - 19 मार्च सकाळी 12:29
शिवयोग - 17 मार्च सकाळी 03:33 - 18 मार्च रात्री 11:54
पापमोचनी एकादशी पूजा विधी (Papmochani Ekadashi Puja vidhi)
पद्मपुराणानुसार एकादशीला हरी विष्णूचं व्रत केल्यास वैवाहिक सुख प्राप्त होतं.
या एकादशीला निर्जल किंवा निष्फळ व्रत ठेवा.
सकाळी उठून शुभ मुहूर्तावर हळद, चंदन आणि तुळस अर्पण करा.
यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चा जप करा.
असं म्हणतात ही पूजा केल्यास धनाची कमतरता भासत नाही.
पापमोचनी एकादशी मंत्र (Papmochani Ekadashi Mantra)
ॐ नमो भगवते वासुदेवाय
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय।।
ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
ॐ विष्णवे नम:
ॐ हूं विष्णवे नम:
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)