Parivartan Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी संक्रमण करत असतात. या संक्रमणातून अनेक योग निर्माण होतात. काही योग हे शुभ तर काही अशुभ असतात.  मंगळ आणि गुरू राशी बदलामुळे परिवर्तन राजयोग तब्बल 10 वर्षांनी तयार झाला आहे.  मंगळ धनु राशीत प्रवेश केला आहे. तर धनु राशीवर गुरूचं राज्य असल्याने परिवर्तन राजयोग निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळ मकर राशीच्या 12 व्या घरात प्रवेश केला असून गुरू मकर राशीच्या चौथ्या घरात पूर्वगामी स्थितीत आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभासोबत प्रगती होणार आहे. (Parivartan Rajyog 2023 formed after 10 years due to Jupiter Mars People of  this zodiac sign will be rich)


कर्क राशी (Cancer Zodiac)   


परिवर्तन राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये यशही मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक यश लाभणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या भौतिक सुविधांवर खूप खर्च करणार आहात. तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष लाभ मिळणार आहे. तसंच गुरूच्या कृपेने यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. या काळात तुम्ही एखादं वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करणार आहात. 


कन्या राशी (Virgo Zodiac)   


परिवर्तन राजयोग तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळणार आहे. नवीन ऑर्डर देखील प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी प्रलंबित असलेली कामं मार्गी लागणार आहे. यावेळी तुम्ही काही नवीन काम सुरू करणार आहात. तर बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. तुम्हाला नवीन प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसंच यावेळी मेहनतीसोबत नशीबही तुमच्या पाठीशी उभं असणार आहे. 


मकर राशी (Capricorn Zodiac) 


तुमच्या लोकांसाठी, परिवर्तन राजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगली संधी मिळणार आहे. तसंच, यावेळी तुम्हाला समाजात मान-प्रतिष्ठा लाभणार आहे. नवीन लोकांशी तुमचं संबंध वाढणार आहे. तसंच मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)