Paush Amavasya 2022: आता लवकरच 2022 हे वर्ष संपणार असून आपण 2023 मध्ये प्रवेश करणार आहोत. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील (krushna paksha) कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. डिसेंबर महिन्याची ही सर्वात शेवटची अमावस्या (half moon 2022) असेल तसेच ही तितकीच खासही आहे कारण या दिवसाचे महत्त्व आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचे आहे. या अमावस्येला अनेक धार्मिक कार्य केले जातात. पुर्वजांच्या (ancestors) आत्म्याला शांती मिळावी म्हणून या दिवशी श्राद्ध केले जाते तर पितृदोष आणि कालसर्प दोष यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी उपवासही केला जातो. पौष महिन्यात सुर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्वदेखील आहे. ही अमावस्या वर्षातील शेवटी अमावस्या असल्यानं यादिवशी आपण महत्त्वाची कार्य संपन्न करू शकतो. यावेळी पौष अमावस्या 23 डिसेंबर म्हणजेच शुक्रवारी असेल. (paush amavasya 2022 importance dos and donts while performing upvas know more)


काय आहे या पौष अमावस्येचे महत्त्व? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मानुसार सर्व अमावस्या तिथींना या पुजेचं महत्त्व सांगितले जाते परंतु या सर्वांमध्ये पौष महिन्याची अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि फलदायी आहे. असं म्हटलं जातं की हा महिना धार्मिक आणि आध्यात्मिक चिंतनासाठी शुभ आहेतच पण त्याचसोबत आपल्या पुर्वजांच्या शांतीसाठीही आपण व्रत करतो. त्यांच्या आत्म्याला तृप्त आणि आनंदी ठेवण्यासाठी या दिवशी शुभ कार्य केले जाते. ब्रह्मा (brahma), इंद्र, सूर्य, अग्नि, वायू, ऋषी, प्राणी, पक्षीही या दिवशी तृप्त होतात. पुर्वजांसाठी उपवास केल्यानं तुमच्या पदरीही पुण्य पडते. 


पौष अमावस्या पूजन पद्धत नक्की काय आहे? 


पौष अमावस्येचा दिवस हा आपल्या पुर्वजांच्या आत्म्याला तृप्त आणि शांत करण्यासाठी शुभ मानला जातो. पुजेसाठीही हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तेव्हा आता हे जाणून घेऊया की नक्की या दिवशी पूजन करताना कोणती पद्धत वापरावी? या दिवशी प्रथम आंघोळ करावी. आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम गंगा (ganga jal) जल आणि फुलं अर्पण करून सुर्यदेवांची पूजा करावी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी पुर्वजांच्या आत्मशांतीसाठी उपवासही करू शकता. पौष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुळशीची प्रदक्षिणा घालावी. यानंतर पुर्वजांच्या नावानं दान करावे. 


पौष अमावस्येच्या दिवशी कोणती काम करावीत - 


1. या दिवशी सुर्यदेवाची वर म्हटल्याप्रमाणे पूजा करा आणि त्यांना तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करा. 
2. पितृदोषापासून (pitrudosh) मुक्ती मिळवण्यासाठी पुर्वजांची प्रार्थना करा. 
3. या दिवशी आपल्या पुर्वजांच्या आवडीचे पदार्थ बनवा आणि त्या अन्नाताल पहिला भाग गायीला, दुसरा कुत्र्याला आणि तिसरा कावळ्याला अर्पण करा. 
4. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पूर्वजांच्या नावाने तुपाचा दिवा लावा.
5. पौष अमावस्येच्या दिवशी गरजूंना निस्वार्थीपणे मदत करा.
6. या अमावस्येच्या रात्री कोणत्याही निर्जन ठिकाणी जाणे टाळा. 
7. अमावस्येला लवकर उठून स्नान करून सुर्याला पाणी अर्पण करावे. 
8. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)