मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 12 राशी असतात. या 12 राशी त्या त्या व्यक्तीचा स्वभाव दाखवतात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, असं मानलं जातं. मात्र यामध्ये 3 अशा काही राशी असतात ज्यांच्या आयुष्यात दुःख असून देखील त्या व्यक्त करत नाहीत. अशांना छुपे रूस्तम म्हटलं तरी हरकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर आज जाणून घेऊयात अशा तीन राशींबाबत ज्या दुःखी असूनही आपलं दुःख व्यक्त करत नाहीत. इतकंच नाही तर ते समोरच्या व्यक्तीला जाणवू देत नाहीत. 


कन्या 


कन्या राशीच्या व्यक्ती आनंदी आहेत की दुःखी आहेत की अशा प्रकारचे कोणतेच इमोशन्स त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. या लोकांना सतत भिती वाटत राहते की, जर त्यांनी त्याचं दुःख सांगितलं तर त्यांच्या या गोष्टीचा चुकीचा अर्थ घेता कामा नये. त्यामुळे ते आपल्या गोष्टी कोणासोबतही शेअर करत नाही. 


वृश्चिक 


वृश्चिक राशीच्या व्यक्ती फार रहस्यमयी मानल्या जातात. या राशीच्या व्यक्तींचे मित्रही बरेच असतात. मात्र असं असूनही ते आपल्या समस्या कोणालाही सांगत नाहीत. जर तुमच्या कोणत्या एका मित्राची रास वृश्चिक असेल तर तुम्हालाही जाणवत असेल की, ते कोणाशीही पर्सनल गोष्टी शेअर करत नाहीत. 


कर्क 


कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वात इमोशनल समजलं जातं. कुटुंब, सुख, दुःख यांना त्यांच्या आयुष्यात खूप मोठं स्थान असतं. मुळात या व्यक्ती फार इमोशनल असतात मात्र आपल्या चेहऱ्यावर दुःख लपवत नाहीत. जोपर्यंत एखादी व्यक्ती त्यांना समजून घेईल वाटत नाही तोपर्यंत या व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कोणालाच सांगत नाहीत. 


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)