Pinky Finger Personality Test in Marathi : तुम्ही कसे आहात हे हाताची सर्वात लहान बोटावरुनही समजू शकते. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठे रहस्य लहान बोट सांगते. याविषयी हस्तरेषाशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हस्तरेषाशास्त्रात हाताच्या रेषा, चिन्ह आणि चिन्हांच्या आधारे भविष्यातील घडामोडींचे शुभ आणि अशुभ संकेत सांगितले जातात. दुसरीकडे, सामुद्रिक शास्त्र शरीराच्या विविध भागांची रचना, त्यांचा रंग, आकार आणि प्रकार यांच्याद्वारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला स्वभाव कसा आहे आणि आपण कशा स्वभावाचे आहोत, हे हातावरुन समजले जाते. आता हाताच्या  बोटावरुनही तुम्ही केस आहात, हेती ओळखता येते. हाताचे सर्वात लहान बोट देखील तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगते. सामुद्रिक शास्त्रात याबद्दल बरेच तपशील सांगितले आहेत. सर्वात लहान बोटाची लांबी तुमच्याबद्दल काय सांगते जाणून घेऊ शकता. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र, हाताच्या बोटावरुन तुमचा स्वभाव आणि तुम्ही कसे आहात, ते समजते.


करंगळीतून तुमचा स्वभाव जाणून घ्या 


A- तळहातावरचे सर्वात लहान बोट, रिंग फिंगर. रिंग फिंगर म्हणजेच अनामिका बोटाच्या पहिल्या पेरपेक्षा लांब असेल तर अशी व्यक्ती खूप संवेदनशील आणि भावनिक असते. अशी व्यक्ती सर्वांवर प्रेम करते आणि प्रेमात जगण्याची आणि मरण्याची शपथ सहजपणे घेते. जरी अशी व्यक्ती खूप रहस्यमय आहे आणि आपल्या गोष्टींबद्दल कोणालाही सांगत नाही. असे लोक नेहमी त्यांच्या ध्येयासाठी समर्पित असतात. यासोबतच त्यांच्या आयुष्यात लाइफ पार्टनरला खूप महत्त्वाचं स्थान असतं. त्यामुळे अशी व्यक्ती लकी असते.


B- ज्या व्यक्तीच्या हाताची सर्वात लहान बोट अर्थात करंगळी अनामिकेच्या पहिल्या पेर पेक्षा लहान असते, ती व्यक्ती खूप चांगली श्रोता बनते. अशा व्यक्तीच्या मनात नेहमी इतरांच्या संकटात दुःखी राहून त्यांना मदत करण्याची भावना असते. ती त्वरीत लोकांना क्षमा करते आणि त्याचे बहुतेक आयुष्य इतरांना मदत करण्यात घालवते.


C- ज्या लोकांच्या हाताची सर्वात लहान बोट अनामिकेच्या पहिल्या पेर बरोबर असते, अशा व्यक्तींचे मन खूप शांत असते. आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची अद्भुत कला त्याच्याकडे आहे. त्यांना जीवन शांततेने जगणे आणि चांगले व्यवस्थापक बनणे आवडते. ते नेहमी गर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करतात.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)