Meen Rashifal Yearly Predictions : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीवर गुरु ग्रहाचे राज्य मानलं जातं. गुरु हा ग्रह ज्ञान, अध्यात्म, गुरु, वृद्धी आणि समृद्धीचा कारक असतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पति शुभ स्थानावर असतो त्याला समाजात मान-प्रतिष्ठा प्राप्त होते. 1 जानेवारी 2024 ला मीन राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहिली असता, राहू ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात आणि गुरु ग्रह दुसऱ्या स्थानावर असणार आहे. चंद्र सहाव्या भावात आणि केतू सातव्या भावात असणार आहे. बुध आणि शुक्र नवव्या घरात आणि मंगळ, सूर्य दहाव्या घरात विराजमान असेल. तर शनिदेव 12व्या भावात स्थित असणार आहे. या राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे एकंदरीत कुंडलीची स्थिती पाहता आगामी वर्ष तुम्हाला संमिश्र जाणार आहेत. ( Pisces yearly horoscope 2024 predictions Meen rashi know Meen rashifal in marathi)


मीन राशीच्या लोकांचा व्यवसाय 2024 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2023 च्या तुलनेत 2024 हे वर्ष तुमच्यासाठी चांगले असणार आहे. जे व्यवसाय करतात त्यांना या वर्षी चांगला नफा मिळणार आहे. बृहस्पति 1 मे पर्यंत त्यांना चांगला नफा देणार आहे. त्याचबरोबर नोकरदारांनाही चांगले दिवस दिसणार आहे. राहू ग्रह तुमचं काम आणि व्यवसायात प्रगती करणार आहे. पण साडेसाती सुरु असल्याने शनिदेव बाराव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमचा खर्च थोडा जास्त प्रमाणात होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा निर्णय घ्याल.


मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती 2024


तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने 2024 हे वर्ष सरासरीपेक्षा चांगलं असणार आहे. कारण तुमच्या कुंडलीत गुरू धनस्थानी असल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. त्यातून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्याचबरोबर घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. जानेवारी, एप्रिल, जून, सप्टेंबर हे महिने चांगले जाणार आहेत. कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. मात्र तुम्ही जुलै ते ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूक करु नका. या महिन्यांत तुम्ही तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतल्यास फायद्याचं होईल. 


मीन राशीच्या लोकांचे करिअर आणि शिक्षण 2024


2024 हे वर्ष मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आव्हानांनी भरलेले असणार आहे . कारण राहू ग्रह स्वर्गात असणार आहे. म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला थोडे उशिराच मिळणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत आहेत त्यांनी मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे. तसंच, निष्काळजीपणा करु नका. कारण राहू ग्रह तुमचं लक्ष विचलित करु शकतं. 


मीन राशीचे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध 2024


2024 हे वर्षही प्रेमसंबंधांच्या बाबतीत संमिश्र आहे. कारण राहू ग्रहाची पाचवी राशी तुमच्या प्रेमसंबंधांवर असणार आहे. त्यामुळे प्रेमसंबंध असलेल्या लोकांमध्ये काही मतभेद होऊ शकतात. काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच केतू ग्रह सप्तम भावात असल्यामुळे काही वेळा वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. 


मीन राशीचे आरोग्य 2024


मीन राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर या वर्षात आरोग्याची कोणतीही मोठी समस्या निर्माण होणार नाही. पण कामाच्या प्रेशनमुळे तुम्ही तणावात असणार आहात. या वर्षी तुम्हाला थकवा विशेष जाणवणार आहे. रक्ताची कमतरता देखील भासू शकते. म्हणजे किरकोळ आजार होण्याची शक्यता आहे. मात्र जर तुम्ही शनि आणि राहूच्या वाईट प्रभावाखाली असाल तर तुम्हाला अधिक सावध राहणं गरजेचं आहे. 


हा उत्तम उपाय 2024


2024 मध्ये वर्षभर शनिदेवाची पूजा करणे फायद्याचं ठरेल. तसंच शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. काळे तीळ, मोहरीचे तेल आणि बदाम अर्पण करणे शुभ ठरेल. तसंच बुधवारी काळ्या तीळाचं दान करणं शुभ फळं देईल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)