Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक; श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय?
Pitru Paksha 2023 : पितृपक्ष पंधरवडा सुरु असून पितृऋण आणि पितृदोष यातील फरक आणि श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. शिवाय पितृपक्षात पितृऋण आणि पितृदोष उपाय काय आहेत ते पाहा.
Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय महत्त्व असून पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्ष पंधरवडा पाळला जातो. या काळात पितरांसाठी प्रार्थना, पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या दिवसापर्यंत असतो. 29 सप्टेंबर 2023 पासून पितृ पक्ष सुरु झाला असून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. पितृ पक्ष काळात पितृऋण (Pitra Rin) आणि पितृदोषापासून (pitru dosh) मुक्ती मिळवण्यासाठी उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृऋण आणि पितृदोष यात फरक आहे. शिवाय श्राद्ध (Shradha), तर्पण (Tarpan) आणि पिंडदान (Pindan) म्हणजे काय? (pitru paksha 2023 difference between Pitra Rin and pitru dosh and shraadh tarpan pind daan know difference in marathi)
पितृऋण आणि पितृदोषमध्ये काय फरक?
अनेक लोकांचा समज आहे की, पितृऋण आणि पितृदोष एकच आहे. पण धार्मिक मान्यतेनुसार पितृ ऋण आणि पितृ दोष यात फरक आहे. पितृ ऋण म्हणजे जेव्हा पूर्वजांनी आयुष्यात काही चूक किंवा वाईट कृत्ये केलं असतील. या कारणामुळे ते मृत्यूनंतही दुःखी राहतात त्याला पितृऋण असं म्हणतात. पितृऋणामुळे पूर्वजांच्या या पापाची फळं संपूर्ण वंशाला भोगावे लागते. म्हणून पितृपक्ष काळात पितृऋणापासून मुक्तीसाठी उपाय सांगण्यात आले आहे.
तर पितृ दोष म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, मंगळ आणि शनि जर जाचकाच्या कुंडलीतील लग्न घरात आणि पाचव्या घरात असेल तर पितृदोष निर्माण होतो. असं म्हणतात की पितरांना अतिशय राग आला तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.
पितृऋण आणि पितृदोषमध्ये मुक्ती उपाय
पितृऋण आणि पितृदोषमध्ये मुक्ती ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. पितृपक्ष काळात शेणाच्या पोळीवर गूळ आणि तूप लावून ती जाळा. त्यानंतर हनुमान चालीसाचं पठण करा. त्याशिवाय पितृ पक्षाच्या काळात दररोज कापूर होम करा. पितृपक्ष काळात आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. त्याशिवाय कुटुंबातील सर्व सदस्यांकडून नाणी गोळा करून ती मंदिरात दान केल्याने फायदा होतो. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात तर्पण हा विधी करा.
हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! 'या' 5 राशी होणार श्रीमंत
श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय?
ज्योतिष आणि धर्मशास्त्रात पितरांच्या मुक्तीसाठी केलेला विधीला श्राद्ध असं म्हणतात. तर पितर, देवता आणि ऋषींना तीळमिश्रित पाणी अर्पण करणे या विधीला तर्पण असं म्हटलं जातं. पिंडदान हा मोक्षप्राप्तीसाठी सहजसोपा मार्ग असल्याचं मानलं जातं. तर्पण आणि पिंडदान हे विधी धार्मिक स्थळी करतात. तर श्राद्ध हे घरी करता येतं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)