Maha Vipreet Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार गोचर करतात. यावेळी त्यांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होताना दिसतात. दरम्यान या गोष्टींचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. नुकतंच बुध ग्रहाच्या वक्री स्थितीतमुळे खास राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध ग्रह 24 ऑगस्ट रोजी वक्री अवस्थेत गेला आहे. बुधाच्या या वक्री स्थितीमुळे महा विपरित राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहणार आहे. यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना ज्यांना यावेळी मालमत्ता, शेअर मार्केट आणि लॉटरी यातून फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांसाठी महा विपरित राजयोग बनणे फायदेशीर ठरू शकते. महा विपरीत राजयोग बनून तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकणार आहे. बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. या कालावधीत तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडणार आहेत. 


कन्या रास (Kanya Zodiac)


महा-विपरीत राजयोग तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकणार आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार केल्यास फायदा होईल. 


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी महाविपरीत राजयोगाची निर्मिती शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होणार आहेत. शेअर मार्केट आणि लॉटरी यातून नफा कमावता येणार आहे. काहींना सोने-चांदी विकून पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )