मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल आणि संक्रमणाचा काळ ठरलेला असतो. जेव्हा जेव्हा हे ग्रह मार्गक्रमण करतात किंवा मागे फिरतात तेव्हा त्याचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. वर्ष 2022 मध्ये 8 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि उर्वरित साडेतीन महिन्यांत महत्त्वाचे ग्रह संक्रमण करणार आहेत. या दरम्यान सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ राशी बदलतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या काळात शनि ग्रह मार्गस्थ असणार आहे. काही राशींवर याचा खूप शुभ प्रभाव पडेल. या लोकांना भरपूर पैसा आणि यश मिळेल.


डिसेंबर 2022 पर्यंत 4 राशींसाठी शुभ काळ


मिथुन


मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याचा उर्वरित काळ आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंतचा काळ चांगला जाणार आहे. या राशीच्या व्यक्तींना बढती मिळू शकते. उत्पन्न वाढणार आहे. 


वृश्चिक


2022 चा उरलेला काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. सूर्य आणि शुक्राचं संक्रमण या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळतील. उत्पन्न वाढणार आहे. व्यापारी आपला व्यवसाय पसरवतील आणि अधिक नफा कमावतील. 


धनु 


शुक्र आणि सूर्याचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. हे ग्रह त्यांना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम यश मिळवून देतील. व्यवसायात भरपूर फायदा होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल आणि पगार वाढेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. 


मीन 


मीन राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि बुध यांचा राशी बदल लाभ देईल. या व्यक्तींना कामात फायदा होईल. करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. अडकलेला पैसा सापडेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आतापर्यंत सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)