Shani And Surya Made Samsaptak Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी चाल बदलत असतात. दरम्यान ग्रहांच्या या बदलाचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही योग तयार होतात. या सर्व योगांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होताना दिसतो. अशातच सूर्य देवाने नुकतेच सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे खास योग तयार झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि शनी यांच्यामुळे समसप्तक योग तयार झाला आहे. या दोन ग्रहांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. मात्र हे दोघंही आपल्या चिन्हात असल्याने समसप्तक योगाच्या प्रभावामुळे, 3 राशीच्या राशीच्या लोकांना चांगला फायदा होणार आहे. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


समसप्तक योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात वडिलांशी जे संबंध खराब होते ते सुधारणार आहेत. 29 ऑक्टोबर रोजी तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. नोकरदार लोकांनाही यश मिळणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी चांगल्या घडणार आहेत.


तूळ रास (Tula Zodiac)


तूळ राशीच्या लोकांसाठी समसप्तक योगाची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारापासून आराम मिळू शकतो. तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळू शकतात. त्याचबरोबर शनिदेवाच्या कृपेने कोणत्याही कामात यश मिळेल. तसंच कामात चांगला नफा मिळू शकतो. कोर्ट- कोर्टातील प्रकरणे सोडवता येणार आहे. तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळणार असून तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. 


मेष राश (Aries Zodiac)


समसप्तक योग तुम्हा लोकांसाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाहीये. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होतेय. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. सूर्याच्या कृपेने संतानाची चांगली प्रगती होऊ शकते. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )