Pradosh Vrat 2023 : पंचांगानुसार दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येतं. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी बुधवारी म्हणजे 27 सप्टेंबरला आहे. जे व्रत बुधवारी येत त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित आहे. हे व्रत केल्यामुळे आपली सर्व मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. यासोबत आयुष्यातील सर्व मानसिक आणि शारीरिक त्रास नाहीसे होतात, असं शास्त्रात मानलं जातं. यंदाचा प्रदोष व्रत अतिशय खास आहे. कारण यंदा बुध प्रदोष व्रताला दुर्मिळ 'कौलव करण' सह 6 आश्चर्यकारक शुभ संयोग जुळून आला आहे. असं म्हणतात की, या योगांमध्ये महादेवाची आराधना केल्याने साधकाला अनेक पटींनी ते फलदायी ठरते. (pradosh vrat 2023 these 6 yogas are being formed on budh pradosh vrat Lord Shankar blessings )


प्रदोष व्रत शुभ मुहूर्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 27 सप्टेंबरला दुपारी 01:45 वाजता सुरू होणार असून रात्री 10:28 पर्यंत असणार आहे.  या दिवशी प्रदोष काळ संध्याकाळी 06.12 ते 08.36 पर्यंत असणार आहे. 


शुभ योग


ज्योतिषांच्या मते बुध प्रदोष व्रताच्या दिवशी धृति योग आहे. धृती योग शुभ कार्यासाठी शुभ असतो. या योगामध्ये देवांचे अधिपती महादेवाची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य लाभतं. 


रवि योग


बुध प्रदोष व्रताला धृति योगासोबत रवियोगदेखील आहे. या दिवशी सकाळी 07:10 पासून संध्याकाळी 07:07 पर्यंत रवि योग असणार आहे. या योगामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केल्याने जाचकाला शाश्वत फळ मिळतं अशी मान्यता आहे. 


अमृत काल योग 


बुध प्रदोष व्रताच्या दिवशी अमृत कालचा शुभ मुहूर्त सकाळी 10.05 ते 11.31 पर्यंत असणार आहे. पण पंचांगानुसार बुध प्रदोष व्रताच्या दिवशी अभिजीत मुहूर्त नाही.


नक्षत्र योग


बुध प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी 7:10 वाजेपर्यंत धनिष्ठा नक्षत्र असणार आहे. ज्योतिषशास्त्रात धनिष्ठा नक्षत्र शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात तुम्ही महादेवाची पूजाही केल्यास शुभ फळं मिळतात. यानंतर शतभिषा आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रं असणार आहे. 


करण


बुध प्रदोष व्रताच्या दिवशी दुपारी 12:03 वाजेपर्यंत कौलव करण असणार आहे. ज्योतिषशास्त्र कौलव करणाला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. कौलव करणात जन्मलेले लोक धार्मिक असतात, असं म्हणतात. त्यामुळे कौलव शुभ करणात गणले गेलं आहे. त्याचवेळी कौलव करणानंतर तैतिल करण असून ते रात्री 10.18 वाजेपर्यंत असणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)