Pradosh Vrat 2023 : कुंडलीत चंद्र कमजोर आहे? आज प्रदोष व्रतात `या` वस्तूंचं करा दान
Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील प्रदोष व्रत आज आहे. जे व्रत बुधवारी येतं त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात.
Pradosh Vrat 2023 : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व असून हे व्रत भगवान भोलेनाथ यांना समर्पित असतं. ज्याप्रमाणे महिन्याला दोन एकादशी येतात, अगदी तसंच दोन प्रदोष व्रत असतात. प्रदोष व्रत हे त्रयोदशी तिथीला पाळलं जातं. कुंडलीतील चंद्र ज्या जाचकाचा कमजोर असेल त्यांच्यासाठी प्रदोष व्रत अतिशय महत्त्वाचे आहे. (pradosh vrat october 2023 puja vidhi shubh muhurat shukla yoga and is moon weak in horoscope donate these things)
प्रदोष व्रत तिथी
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आज म्हणजे बुधवारी 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 05:37 पासून सुरू गुरुवार 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 07:53 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 11 ऑक्टोबर म्हणजे आज बुद्ध प्रदोष व्रत पाळले जाणार.
प्रदोष व्रत पूजा मुहूर्त
पंचांगानुसार पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:56 पासून रात्री 08:25 वाजेपर्यंत असणार आहे.
प्रदोष व्रताला शुभ योग
बुध प्रदोष व्रताला म्हणजे आज दोन शुभ योग आहेत. व्रताच्या दिवशी पहाटेपासून 08.42 पर्यंत शुभ योग तर त्यानंतर शुक्ल योग आहे. त्याशिवाय माघ नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी 8.45 पर्यंत असून नंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे.
कुंडलीत चंद्र असा करा बलवान!
प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा विधीनुसार केल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. पूजेच्या वेळी भोलेनाथाला दूध आणि दही अर्पण करा. त्यानंतर ते गरीब आणि असहाय्य लोकांना दान केल्यास भगवान शंकर आणि माता पार्वती लवकर प्रसन्न होतात, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. यासोबतच या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान केल्याने कुंडलीत चंद्र ग्रहाची मजबूत स्थिती तयार होते.
तर व्यवसाय वाढीसाठी उडीद डाळ दान करणे शुभ मानले जाते. करिअर आणि व्यवसायातील यश आणि प्रगतीसाठी गरजू लोकांना पांढरे कपडे दान केल्यास फलदायी ठरते.
हेसुद्धा वाचा - Rahu Ketu Gochar 2023 : दिवाळीपूर्वी राहू-केतूचं गोचर, 'या' 5 राशींची लोक 2025 पर्यंत होणार कोट्यधीश
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)