Rahu Ketu Gochar 2023 : यंदाच्या दिवाळीला (Diwali 2023) खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं आगमन होणार आहे. कारण मायावी राहू केतू दिवाळीपूर्वी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करणार आहे. प्रत्येक ग्रह, नक्षत्र ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदल असतात. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी राहू आणि केतू राशी परिवर्तन करत आहे. येत्या 30 ऑक्टोबरला राहू मेष राशीतून मीन राशीत तर केतू तूळ राशीतून कन्या राशीत संक्रमण करणार आहे. 18 मे 2025 राहू मीन तर केतू कन्या राशीत विराजमान असणार आहे. त्यामुळे दिवाळ आणि पुढील दीड वर्ष 5 राशींच्या लोकांना छप्पड फाड पैसा देणार आहे. (Rahu Ketu transit before Diwali 2023 these 5 zodiac signs will become millionaires by 2025 )
या राशीत राहू-केतूचे संक्रमणामुळे जीवनात यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. आवड जोपासण्यासाठी हा अनुकूल काळ असणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन नोकरीत सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी ही उत्तम संधी आहे. व्यावसायिकांसाठी नफ्याच्या पातळीत वाढ होणार असून तुम्ही व्यवसायाचा विस्तार करणार आहात. तुमच्या जोडीदारासोबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी आणि योग्य परिणाम मिळवण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
राहू-केतू संक्रमण तुम्हाला जीवनात यश प्राप्त होणार आहे. यामुळे कर्क राशीचे लोक अडचणीतून बाहेर पडणार आहात. व्यावसायिकांना योग्य प्रमाणात नफा मिळणार आहे. तसंच त्रासदायक कामांचे निराकरण होणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कामाच्या कामगिरीतही सुधारणा होणार आहे. नवीन नोकरीमध्ये सामील होण्यासाठी आणि तुमच्या सध्याच्या जॉब प्रोफाइलमध्ये प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.
दिवाळीपूर्वी राहू-केतूचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनातील सर्व समस्यांवर दूर करणारा ठरणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ व्यतित करणार आहात. सिंह राशीचे लोक भाग्याच्या बाजूने राहणार आहे. कुटुंबात आनंदायी वातावरण असणार आहे. योग्य प्रयत्न केले तर प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. तुमच्या व्यावसायिक जीवनात नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी राहू-केतूचे संक्रमण विवाहित लोकांसाठी आरामदायी ठरणार आहे. अविवाहित लोकांसाठी ही उत्तम वेळ आहे. तसंच, उत्पन्न पातळी वाढण्याचा अनुभव मिळणार आहे. कामकाजाच्या जीवनातील समस्या दूर होणार आहे. जीवनात उत्पन्नाचे नवीन स्रोत गवसणार आहे. अडकलेले पैसेही वेगवेगळ्या ठिकाणाहून प्राप्त होणार आहे. तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहणार आहे. खर्चावर नियंत्रण राहील. अपेक्षित यश मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहेत.
मीन राशीसाठी तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी नवीन उंची गाठण्याची ही एक आदर्श संधी आहे. तुमच्या कामाचे योग्य नियोजन करा जेणेकरून तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. नवीन सौदे होणार आहेत. लाभाची शक्यता प्रबळ असणार आहे. दिवाळीपूर्वी राहू-केतूचे संक्रमण जीवनातील अनेक समस्या सोडवण्याची उत्तम संधी ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.