Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj : संत श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांचे सोशल मीडिायवर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांच्या सत्संगाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि SSS प्रमुख मोहन भागवत हे सेलिब्रिटी दिसून आले आहेत. ते वृंदावनमध्ये राहतात आणि राधा राणीचे ते निस्सीम भक्त आहेत. महाराजांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक भक्त त्यांना विचारतोय की, 'अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अकाली मृत्यू येतो?' त्याशिवाय 'त्याच्या आयुष्यात पैशाची समस्या असते?' यावर प्रेमानंद महाराजांनी 5 मुख्य कारणं सांगितलीय. (Premanand Maharaj says these 5 bad habits lead to premature death)


तुम्ही तर अशी चूक करत नाही ना?


'हे' काम संध्याकाळी करू नका!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेमानंद गोविंद शरण महाराज म्हणाले की, जे लोक संध्याकाळच्या वेळी अन्न खातात किंवा शारीरिक संबंध ठेवतात, त्या लोकांचे वय कमी आहे. तसंच अशा लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी संध्याकाळी करू नयेत. कारण संध्याकाळची वेळ भागवत भजनाची मानली जाते. 


संत आणि शिक्षकांचा अपमान


महाराज सांगतात की, जे संत आणि गुरूंचा अनादर करतात. त्यांना शिवीगाळही करतात. त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. याशिवाय या चुकीच्या सवयीमुळे तुमचा लवकर मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे संत आणि गुरूंनी कधीही अपशब्द वापरू नयेत.


इतरांच्या 'या' गोष्टी वापरू नका


महाराज आपल्या प्रवचनात सांगतात की, माणसाने कधीही इतरांचे कपडे, चप्पल आणि घड्याळ घालू नये. कारण असे केल्याने जीवनात दारिद्र्य येतं. तसंच विचार नकारात्मक असल्यास तुमचं वयही कमी होतं. 


या दिवशी या गोष्टी करू नका


प्रेमानंद जी महाराज सांगतात की, पौर्णिमा, चतुर्दशी, एकादशी, अष्टमी आणि अमावस्या तिथीला शारीरिक संबंध ठेवू नयेत . तसंच या तारखांना नॉनव्हेज आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. कारण असे केल्याने आयुर्मान कमी होतं.


ब्रह्म मुहूर्तावर झोपावे


महाराज सांगतात की, जे लोक ब्रह्म मुहूर्तावर उठत नाहीत आणि झोपून राहतात अशा लोकांचे आयुर्मानही कमी होतं. कारण ब्राह्ममुहूर्त हा योग, ध्यान आणि भजन करण्याची वेळ असतो. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)