Puja Niyam in Martahi : हिंदू धर्मात पूजा विधीला विशेष महत्त्व असून धर्मशास्त्रात त्यासंदर्भात नियम सांगण्यात आलेय. तुम्ही केलेल्या पूजेचे पूर्ण फळं मिळावं अशी इच्छा असेल तर योग्य पद्धतीने देवाची आराधना आणि पूजा करणं गरजेचं असतं असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. देवघर किंवा देव्हारा हा हिंदू घरांमध्ये दिसून येतो. सकाळ संध्याकाळ घरांमध्ये पूजा करण्यात येते. या देवघरासाठी घरात खास जागेचं आयोजन केलं जातं. गावांमधील घरांमध्ये तर देव पूजेसाठी वेगळी खोली असते. पण शहरांमध्ये जे घरांमध्ये माणसंच कशीबशी राहतात तिथे देवासाठी खोली शक्य नसतं. अशावेळी घरातील एका कोपऱ्यात भिंतीवर छोटसं देव्हारा लावला जातो. (Puja standing or sitting What does the scriptures say right method of god worship in marathi)


पूजा उभ्याने करायची की बसून? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशास्थिती त्या घरांमध्ये उभं राहून पूजा केली जाते. पूजा नियमानुसार उभ्याने की बसून नेमकी कशी पूजा करणं योग्या आहे, याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषार्चाय आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. धार्मिक शास्त्रानुसार उभे राहून पूजा करणे अशुभ मानले जात नाही. त्याशिवाय थेट जमिनीवर बसूनही पूजा करणे अयोग्य मानलं गेलंय.


देवाची पूजा करताना तुम्हाला आसन किंवा पाटावर बसून पूजा करावी असं सांगण्यात आलंय. त्यासोबत पूजा करताना महिलांना डोक्यावर पदर आणि पुरुषांनी टोपी किंवा रुमालने झाकलं पाहिजे असं सांगण्यात आलंय. अशी मान्यता आहे की, डोकं झाकलं नाही तर पूजेचं पूण्य आणि लाभ आकाशात निघून जातं. 


घरात देव घर योग्य जागी असणं महत्त्वाच आहे. शास्त्रानुसार पूर्व पश्चिम दिशेला देवघर असावं. त्याशिवाय देवघराचं पावित्र्य राखलं जाईल अशी त्याची जागा असावी. 


सर्वात महत्त्वाचं जागेअभावी मंदिर भिंतीवर लटकवलं जातं, ते योग्य नाही. अशास्थितीत भिंतीला जोडून एक कठडा करावा आणि त्यावर देव्हारा ठेवावा. तसंच उपासना ही मात्र कायम जमिनीवरच बसून करावी. 


उभ्याने पूजा केल्यास काय होतं?


उभ्याने पूजा केल्यास काय होतं यामागे शास्त्रीय कारणं सांगण्यात आलीय. उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते. त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारणं आहेत. देवघरातील मूर्ती, निरांजन, दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला. त्या गोष्टी जमिनीवर पडल्यास त्या भंग पावल्या जातात. धर्मशास्त्रात हे अशुभ मानलं जातं आणि आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो अशी मान्यता आहे. त्याशिवाय निरांजन किंवा दिवा पडल्यास घरात आग लागण्याचा धोका असतो. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)