Radha Ashtami 2023 : आज राधा अष्टमीला 3 शुभ योग! जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Radha Ashtami 2023 : आज राधा अष्टमी उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या तीन शुभ योग जुळून आले आहेत.
Radha Ashtami 2023 : श्रीकृष्णाचं नाव घेतलं की, आपसूकच राधाचे नाव आपल्या ओठी येतं. कृष्ण जन्माष्टमीनंतरच्या 15 दिवसांनंतर राधा अष्टमी येते. पंचांगानुसार भाद्रपदाच्या अष्टमी तिथीला राधा अष्टमी साजरी केली जाते. मथुरा, वृंदावन आणि बरसाना येथे राधाअष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. असं मानलं जातं की या दिवशी राधा राणीची पूजा केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. राधाअष्टमी हा सण राधाची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राधा राणीसह श्रीकृष्णाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं म्हणतात. (radha ashtami 2023 today puja shubh muhurat pujan vidhi and Three auspicious yogas on Radha Ashtami)
अष्टमी तिथी
पंचांगानुसार अष्टमी तिथीला 22 सप्टेंबर दुपारी 1.35 वाजेपासून सुरुवात झाली असून 23 सप्टेंबरला दुपारी 12.27 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार आज 23 सप्टेंबरला राधा अष्टमी साजरी करण्यात येणार आहे.
राधा अष्टमी पूजा मुहूर्त - 23 सप्टेंबर, सकाळी 11:01 ते दुपारी 1:26 पर्यंत
राधा अष्टमीला 3 शुभ योग
आज राधा अष्टमीला 3 शुभ योग जुळून आले आहेत. राधाअष्टमी तिथीला दिवसभर रवियोग आहे. त्याशिवाय पंचांगानुसार शोभन योग रात्री साडेनऊ ते दुसऱ्या दिवशीपर्यंत असणार आहे. तर सौभाग्य योग 22 सप्टेंबरला रात्री 11:52 ते 23 सप्टेंबरला रात्री 9:23 पर्यंत असणार आहे.
राधा अष्टमी पूजा विधी
पूजास्थळी एका पाटावर मातीचा कलश स्थापन करा. त्यानंतर कलशावर तांब्याचे भांडे ठेवावा. यानंतर राधा राणीची मूर्ती स्थापित करा.राधा राणीची सर्व विधीपूर्वक पूजा करा. पूजेनंतर उपवास करण्याचा संकल्प घ्या आणि दिवसभर उपवास ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा आणि प्रसाद घ्यावा.
राधाअष्टमीचे महत्त्व
राधा अष्टमीचं व्रत केल्या सर्व पापांचा नाश होतो, असं म्हणतात. यादिवशी विवाहित स्त्रिया संततीच्या सुखासाठी आणि शाश्वत सौभाग्यासाठी उपवास करतात. पौराणिक कथेनुसार, राधाजींना प्रसन्न करण्याऱ्यांवर भगवान श्रीकृष्ण आपोआप प्रसन्न होतात, असं म्हणतात. त्याशिवाय राधा अष्टमीला उपवास केल्यास लक्ष्मी माता घरात वास करते आणि आपल्या मनोकामना पूर्ण करते.
राधा अष्टमी उपाय
1. लाल रंगाच्या कपड्यात चांदीची नाणी ठेवा आणि राधा राणीच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर ही नाणी तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. या उपायामुळे घरात संपत्तीत वाढ होते आणि करिअर, व्यवसायात फायदा होतो.
2. आपल्या पतीचं नाव पिवळ्या चंदनाच्या कागदावर लिहा आणि कोणालाही न सांगता श्री राधाच्या चरणी अर्पण करा. असं केल्यानं वैवाहिक जीवनात गोडवा राहतो. प्रेम संबंध अधिक घट्ट होतात.
3. या दिवशी राधा राणीला रबडी हा नैवेद्य अर्पण करा. असं केल्याने नशिबाची साथ मिळते. प्रेम संबंध अधिक घट्ट होतात.
4. राधाअष्टमीच्या दिवशी ''ॐ ह्नीं श्री राधिकायै नमः'' या मंत्राचा 108 वेळा जप करा. असं केल्याने सुख-समृद्धीत वाढ होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)