Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर राशी बदल करतात. त्याचप्रमाणे या वर्षाच्या अखेरीस अनेक महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. आता राहूच्या राशी परिवर्तनाची वेळ जवळ येतेय. ज्योतिष शास्त्रात राहुला पापी, मायावी आणि छाया ग्रह म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडली अशुभ स्थितीत असते, त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण निर्माण होते. अनेक लोक राहूचे नाव घेण्यास टाळाटाळ करतात. राहू नेहमीच अशुभ परिणाम देत नाही. मात्र जर राहु मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम मिळतात.


कधी करणार राहू ग्रह गोचर?


ऑक्टोबर महिन्यान राहू ग्रह त्याची रास बदलणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र काही राशींना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


मीन


राहु ऑक्टोबर 2023 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळू शकणार आहे.  करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. अडकले पैसे परत मिळणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे. 


मेष


मीन राशीच्या राहूच्या प्रवेशामुळे मेष राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. हे गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांना याचा आर्थिक फायदा होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. व्यवसाय किंवा क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल.


कर्क


ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना राहूच्या गोचरमुळे अनेक शुभ परिणाम मिळणार आहे. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल. राजकारणात तुमचा प्रभाव वाढेल आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे होतील.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )