Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो. वर्ष 2023 मध्ये राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह गोचर करणार आहेत. राहु ग्रह मीन राशीत 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी प्रवेश करेल. खऱ्या अर्थाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी  रात्री 12 वाजून 46 मिनिटांनी स्थित होईल. तर केतु 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल. तर 29 नोव्हेंबर 2023 रोजी  रात्री 12 वाजून 46 मिनिटांनी स्थित होईल. हे दोन्ही ग्रह एका राशीत दीड वर्षे ठाण मांडून असतात. म्हणून 2024 या वर्षात दोन्ही ग्रह आपलं स्थान बदलणार नाही. त्यानंतर थेट 18 मे 2025 रोजी गोचर करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहु गोचर चार राशींना अशुभ फळ देईल. या जातकांना राहुची स्थिती त्रासदायक ठरु शकते. आर्थिक हानी या काळात होऊ शकते. शारीरिक तसेच मानसिक त्रास या काळात होऊ शकतो. गुंतवणूक फलदायी ठरणार नाही. तसेच हा काळ अडचणीचा ठरणार आहे. ऑक्टोबर 2023 रोजी राहु ग्रहाने गोचर करता मेष, वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना अडचणीचा जाईल. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पण चार राशींना फायदा होणार आहे.


बातमी वाचा- Mangal Dosh:कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास असा त्रास होतो, या उपायांनी दूर करा समस्या


  • मिथुन- राहुच्या राशी परिवर्तनामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. मान सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन तसेच पगारवाढ मिळेल. तसेच ताण तणावातून सुटका होऊ शकते.

  • कर्क- राहु गोचराचा कर्क राशीच्या लोकांना फायदा होईल. व्यवसायात भरभराट दिसेल. घर आणि वाहन खरेदीचा योग आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्यांना या काळात नवी संधी मिळेल.

  • कुंभ- राहु गोचर कुंभ राशीच्या लोकांना फलदायी ठरेल. या काळात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच अडकलेले पैसे मिळू शकतात. आपल्या शब्दावर कठीण कामं पूर्णत्वास जातील. 

  • मीन- राहु गोचर करत या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे निश्चित या राशीच्या लोकांना फायदा होईल. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. उधार दिलेले पैसे मिळतील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)