Rahu Gochar 2023: 18 महिन्यानंतर राहू करणार गोचर; `या` राशींवर पडणार पैशांचा पाऊस!
Rahu Gochar 2023 : राहु हा चांगला ग्रह मानला जात नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूच्या राशीचा बदला खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, राहू सुमारे दीड वर्ष राशीत राहतो
Rahu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये राहुला अशुभ ग्रहांच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलंय. राहु हा चांगला ग्रह मानला जात नाही. मात्र राहु कोणत्याही राशीत असला तरी तो त्या राशींच्या स्वामीनुसार परिणाम देतो. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूच्या राशीचा बदला खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, राहू सुमारे दीड वर्ष राशीत राहतो
राहु 30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीवर होणार आहे. मात्र अशा काही राशी आहेत, ज्यांच्यावर याचा चांगला परिणाम होणार आहे. यामध्ये 5 राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
मेष रास
मीन राशीतील राहूचं गोचर या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींना आर्थिक फायदा मिळू शकणार आहे. शिवाय तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला करियरमध्येही चांगलं यश मिळू शकणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार असून तुमचे प्रश्नही सुटणार आहेत. बिझनेसमध्ये तुमची चांगली प्रगती होण्याची चिन्ह आहेत.
वृषभ रास
राहुने मीन राशीमध्ये प्रवेश केल्या वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी उत्तम आहे. याशिवाय करियरमध्येही विद्यार्थी उच्च स्थान गाठू शकणार आहेत. कुटुंबामध्ये असलेले वाद संपुष्टात येणार आहेत. कोणता प्रवास करणार असाल तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
कर्क रास
मीन राशीतील राहूचं गोचर या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळामध्ये तुमची रखडलेली कामं मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकतात. गाडी खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता. परदेश प्रवासाचा योग आहे.
तूळ रास
राहूच्या गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींना अधिक फायदा होणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. अनपेक्षित कामांमध्ये तुम्हाला अचानक यश मिळू शकणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे आर्थिक प्रश्न सुटू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार असून इतर सहकारी तुम्हाला मदत करतील.
मीन रास
राहु मीन राशीत प्रवेश केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अचानक तुम्हाला अज्ञात स्त्रोतांकडून पैसे मिळणार आहेत. या काळामध्ये कर्ज घेतलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. समाजात मानसन्मान वाढणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )