Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील छाया ग्रह राहू हा अतिशय महत्त्वाचा आहे. शनिदेवासारखं राहू ग्रहाची जाचकाला भीती वाटते. कारण राहु ग्रह ज्या व्यक्तीच्या कुंडलीत विराजमान असतो त्याच आयुष्य संकटाने भरलेलं असतं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहायला मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहु ग्रह एका राशीत हा 18 महिने स्थायिक असतो. राहून गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर 2023 ला मेष राशीतून निघून मीन राशीत गोचर केलंय. या राशीत आता राहू 18 मे 2025 ला दुपारी 4:30 पर्यंत विराजमान राहणार आहे. राहूचं हे गोचर काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. पुढील एक वर्ष या लोकांना आर्थिक लाभासह अनेक फायदे मिळणार आहेत.  (Rahu Gochar 2024 rahu transit in meen grace will stay on these signs till 2025 Opportunity for financial gain with promotion)


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या कुंडलीत राहू अकराव्या घरात असल्याने या लोकांना विशेष लाभ होणार आहे. या लोकांचे बँक बॅलेन्स दिवसेंदिवस वाढणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय. अनपेक्षित स्रोतातून आर्थिक लाभही होणार आहे. खूप असलेल्या तुमच्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. आयुष्यात खूप आनंदच आनंद असणार आहे. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होणार आहात. परदेशात व्यवसाय असेल तर तिथूनही नफा मिळणार आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन गुंतवणूक करणे देखील फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच तुम्हाला कामानिमित्त अनेक लांबच्या प्रवासाला जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंबाला जास्त वेळ देणार आहात. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


मीन राशीत राहुचं असणे मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. राहु या राशीच्या नवव्या घरात असून या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही चालून येणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. मात्र, खर्चात थोडी वाढदेखील होणार आहे. नोकरदार लोकांनाही खूप फायदा होणार आहे. उत्कृष्ट कामगिरीसह, पदोन्नती आणि वाढीच्या शक्यता आहे. एकंदरीत 2025 पर्यंत मिथुन राशीच्या लोकांवर राहूचा प्रभाव सकारात्मक परिणाम करणारा ठरणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)   


राहू मीन राशीत प्रवेश केल्यामुळे या लोकांच्या कुंडलीत पाचव्या घरात राहु आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अपार यशासोबत आर्थिक लाभही मिळणार आहे. बेटिंग आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला गवसणार आहे. यासोबतच अचानक आर्थिक लाभ होणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करुन गुंतवणूक करण्यात यशस्वी होणार आहात. तुमची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता चांगली सकारात्मक वाढ होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)